<
जळगाव – (प्रतिनिधी) – येथील के सी ई सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात प्रथम वर्ष पॉलीटेक्निक च्या विद्यार्थ्यांकरिता शिक्षक पालक सभेचे आयोजन केले गेले. त्यात विद्यार्थी आणि पालकांनी उत्स्फूर्तपने प्रतिसाद दिला . नुकतेच कॉलेज सुरु होऊन अभ्यासक्रमावर प्रथम घटक चाचणी घेण्यात आली . त्यात विद्यार्थ्यांना मिळालेल्या प्रत्येक विषयाचे पेपर दाखवून मिळालेल्या गुणाचे व विद्यार्थ्यांना होण्याऱ्या शैक्षणिक समस्यांचे निरसन करून मार्गदर्शन करण्यात आले.
प्रत्येक विषय शिक्षकाने विद्यार्थी व पालक यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला .महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय सुगंधी , अकॅडमिक डीन डॉ प्रज्ञा विखार,डिप्लोमा समन्व्यक डॉ सी एस पाटील यांनी पालकांशी सवांद केला आणि मार्गदर्शन केले . शिक्षक पालक सभेला जवळपास 250 पालकांनी सहभाग नोंदविला. शिक्षक पालक सभेला वर्ग शिक्षक प्रा. कामिनी पवार,प्रा. रुपाली साळुंके, प्रा .भरत ढोले,.प्रा चैताली चौधरी व रश्मी वानखेडे. विभाग प्रमुख प्रा.पूजा अडवाणे,प्रा.जे आर पाटील,प्रा.ए.एन शेवाळे,प्रा.तुषार धुमाळ , व प्राध्यापक वृंद ,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.