<
जळगाव, दि. 2 – दरवर्षी 1 ते 7 ऑक्टोबर या कालावधीत वन्यजीव सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. त्याप्रमाणे यावर्षीही 1 ते 7 ऑक्टोबर या कालावधीत वन्यजीव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून या सप्ताहानिमित्त जळगाव शहरातील शहीद स्मारकालगत पिंपळ वृक्षांची लागवड, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा, Cycling For Tiger, वन्यजीवबाबत जनजागृती करण्यासाठी प्रभातफेरीचे आयोजन, वन्यजीवांबाबत माहितीपट दाखविणे आदि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जळगाव वन विभागाचे उप वनसंरक्षक दिगंबर पगार यांनी दिली आहे.
या सप्ताहाचे उदघाटन दि. वा. पगार, उपवनसंरक्षक, जळगाव, प्र. तु. मोराणकर, उपवनसंरक्षक, यावल वनविभाग, व सै. इ. शेख, विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग, जळगाव यांचे हस्ते मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव येथील सभागृहात डॉ. यु. डी. कुलकर्णी, प्राचार्य, मुलजी जेठा महाविद्यालय, जळगाव यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाले. उपस्थित मान्यवरांनी वन व वन्यजीव याबाबत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या उदघाटनप्रसंगी जळगाव वन विभागाचे चि. रा. कामडे, के. र. फंड, सहायक वनसंरक्षक, एन. जी. पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी, पी. टी. वराडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग, आदींसह वनाधिकारी उपस्थित होते. तसेच बायोलॉजिस्ट आयडीयल ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष उमेश पाटील, सचिव श्री. विवेक देसाई आणि मुळजी जेठा महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख श्री. एम. पी. राठोड, सहायक प्राध्यापक डॉ. मनोजकुमार चोपडा, नयन माहेश्वरी, रेवन चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना बायोलॉजिस्ट आयडीयल ऑर्गनायझेशन मार्फत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच वाघ या वन्यप्राण्यावर आधारीत माहितीपट दाखविण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुळजी जेठा महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागातील शिक्षक, कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.