<
मा.ना.गिरीशभाऊ महाजन, मा. ना, गुलाबराव पाटील, माजी मंत्री आ. एकनाथराव यांच्या प्रमुख उपस्थितीत
भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आर.पी. आय (A) रासप, शिवसंग्राम, रयत क्रांती, महायुतीचे अधिकृत उमेदवार व जळगाव शहराचे लोकप्रिय आमदार व महायुतीचे उमेदवार आ. सुरेश दामू भोळे (राजू मामा) हे जळगाव शहराच्या विधानसभेच्या उमेदवारीसाठी आज दि. ३ ऑक्टोंबर २०१९ गुरुवार रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
सकाळी ९ वाजता जि.एम. फौंडेशन (शिवाजी महाराज पुतळ्या समोर) येथून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महायुतीच्या हजारो कार्यकर्ते येथे जमून हजारो कार्यकर्त्यांसह तसेच जलसंपदामंत्री मा. ना. गिरीशभाऊ महाजन, सहकार राज्य मंत्री मा. ना. गुलाबराव पाटील, माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे, यांच्या प्रमुख उपस्थितीत व मा. ना. हरिभाऊ जावळे, ना. गुरुमुख जगवानी, ना. उज्वलाताई पाटील, खा. रक्षाताई खडसे, खा. उन्मेषदादा पाटील, आ. स्मिताताई वाघ, आ. चंदूभाई पटेल, संघटन मंत्री अॅड. किशोर काळकर, डॉ. राजेंद्र फडके, महापौर सीमाताई भोळे, उप महापौर डॉ. अश्विन सोनवणे, शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, आर. पी. आय महानगर प्रमुख अनिल अडकमोल, रासप शिवसंग्राम व रयत क्रांती व स्थायी सभापती जितेंद्र मराठे, महिला सभापती मंगला चौधरी, सभागृह नेते ललित कोल्हे, शिवसेना विरोधी पक्ष नेते सुनील महाजन, गटनेता अनंत (बंटी) जोशी) नितीनभाऊ लढा, उप गट नेते राजेंद्र घुगे पाटील, कंवरलाल संघवी, दीपक सपकाळे, तसेच जळगाव शहरातील सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय कायदे क्षेत्र , औद्योगिक, व्यापारी व गणेश महामंडळ, तसेच धार्मिक, क्षेत्रातील प्रमुख मान्यवरांच्या व महायुतीच्या हजारो कार्यकर्ते उपस्थितीत राहणार असून सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय जळगाव येथे आ. सुरेश भोळे (राजू मामा) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महायुतीचे सर्व पादाधिकारी, व कार्यकर्ते व भारतीय जनता पार्टीचे जिल्हा पदाधिकारी मंडल अध्यक्ष, विविध आघाड्यांचे अध्यक्ष, नगरसेवक, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख तसेच भाजपा पक्षावर व राजू मामा यांच्या स्नेही मित्र परिवाराने मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल करण्याप्रसंगी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा संघटन सरचिटणीस विशाल त्रिपाठी, सरचिटणीस दीपक सूर्यवंशी, राजेंद्र घुगे पाटील, महेश जोशी, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मनोज भांडारकर, महेश ठाकूर, मनोहर चौधरी, संजय शिंदे यांनी केले आहे.