<
विकासाच्या कामातून आपल्याला निवडणूक लढवायची महायुतीचे उमेदवार आ. सुरेश भोळे (राजू मामा)
भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आर.पी. आय (A) रासप, शिवसंग्राम, रयत क्रांती, महायुतीचे अधिकृत उमेदवार व जळगाव शहराचे लोकप्रिय आ. सुरेश दामू भोळे (राजू मामा) यांना कालच महायुतीचि अधिकृत उमेदवारी जाहीर झाली असून जळगाव शहर विधानसभेसाठी दि. ३ ऑक्टोंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आज दि. २ ऑक्टोंबर येथे दुपारी २.३० वाजता जि.एम फौंडेशन येथे भाजपा निवडणूक व्यवस्थापन समितीचे प्रमुख आ. चंदूभाई पटेल यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीला मा. ना. डॉ. गुरुमुख जगवानी, महायुतीचे उमेदवार आ. सुरेश भोळे (राजू मामा) महापौर सीमाताई भोळे , विधानसभा संयोजक डॉ. आश्विनभाऊ सोनावणे ( उपमहापौर), स्थायी समिती सभापती संघटन सरचिटणीस विशाल त्रिपाठी, महेश जोशी, राजेंद्र घुगे पाटील, दीपक साखरे, विस्तारक सचिन पानपाटील, यांच्या उपस्थितीत दि. ३ ऑक्टोंबर रोजी महायुतीचे उमेदवार आ. सुरेश भोळे यांची उमेदवारी दाखल करण्यासाठी नऊ संकल्प अभियान व प्रत्येक बूथ व शक्ती केंद्रावर जाऊन हे अभियान राबवावे यासाठी आजची ही महत्वपूर्ण बैठक होती. बैठकीला प्रमुख मार्गदर्शन करतांना निवडणूक प्रमुख आ.चंदूभाई पटेल यांनी सांगितले कि गेल्या ५ वर्षापासून केंद्रात आणि राज्यात आपलेच सरकार असून गोरगरीब जनतेचे कामे केले असून म्हणूनच पुन्हा देशातील जनतेने पुन्हा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान केले असून पुन्हा ऐक वेळेस महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आणायचे असून व जळगाव शहराचे पुन्हा आमदार म्हणून निवडून आणायचे आहे. म्हणून सर्व बूथ प्रमुख, शक्ती प्रमुख, मंडल अध्यक्ष व कार्यकर्त्यांनी १५ ते २० दिवस आपल्या बूथ स्थरावर संपर्क करून आपली बूथ रचना मजबूत करायची आहे. जळगाव शहराचा विकासासाठी गेल्या ५ वर्षात राजू मामांनी कोट्यावधीचा निधी मंजूर करून आणला आहे, पुन्हा या शहराचा विकास करण्यासाठी पुन्हा या शहराचा विकास करण्यासाठी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांच्या वतीने १ लाख मताधिक्याने निवडून देण्याचा संकल्प या ठिकाणी केला.
बैठकीप्रसंगी मार्गदर्शन करतांना महायुतीचे उमेदवार सुरेश भोळे (राजू मामा) पक्षाने मला जळगाव शहराचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पुन्हा संधी दिली आहे. गेल्या ५ वर्षभरात केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक विकास कामे आणली, कोट्यावधीचा निधी जळगाव शहराच्या विकासकामासाठी केंद्रात व राज्यात आपल्या पक्षाचे सरकार असल्याने हे आपल्या सारख्या सक्षम कार्यकर्ते असल्याने व संघटन मजबूत असल्याने शक्य झाले आहे. मा. ना. गिरीशभाऊ महाजन यांनी सांगितल्या प्रमाणे आपल्याला कुणावर चिखल फेक किंवा आरोप प्रत्यारोप न करता विकासाच्या कामांच्या मुद्द्यावर आपल्याला ही निवडणूक लढवायची आहे. राज्यात पुन्हा युतीचे सरकार येण्यासाठी आपल्याला ही जागा जिंकणे आवशयक आहे. त्याच प्रमाणे विरोधकांकडे कुठलेच मुद्दे नसून आपल्याकडे विकासाचे मुद्दे आहेत. असेही राजू मामा भोळे यांनी सांगितले.
या बैठकीला जिल्हा पदाधिकारी मंडल अध्यक्ष, विविध आघाड्यांचे अध्यक्ष, सर्व नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीप्रसंगी विशाल त्रिपाठी, महेश जोशी नितीन इंगळे, सचिन पानपाटील, यांनी निवडणूक विषयी मार्गदर्शन केले, बैठकीचे प्रास्ताविक राजेंद्र घुगे पाटील, तर मनोज भांडारकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.