लोहारा ता.पाचोरा जि. जळगाव (रिपोर्टर ईश्वर खरे)
महाराष्ट्र राज्याचे संकटमोचक जामनेर तालुक्याचे भाग्यविधाते ना.गिरीश महाजन यांची सलग सातवेळा आमदार पदी नियुक्ती झाल्याबद्दल लोहारा विविध कार्यकारी चेअरमन,व्हा चेअरमन संचालक मंडळ तसेच भारतीय जनता पार्टी व ग्रामस्थ मंडळी व गोदावरी फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरामध्ये एकूण १५७ रुग्णांनी नाव नोंदणी करून मोफत तपासणी केली. यामधील १०८ रुग्ण हे पुढील उपचारासाठी डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मदाय रुग्णालय जळगाव येथे दिनांक ४ डिसेंबरला पाठवण्यात येणार आहेत अशी माहिती आयोजक शरद अण्णा सोनार (भाजपा लोहारा कुऱ्हाड गटप्रमुख.) यांनी दिली. या आरोग्य शिबिरामध्ये हृदयरोग एन्जिओग्राफी एन्जोप्लास्टी तपासणी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच इसीजी, कार्डिओग्राफ, रक्तदाब तपासणी,नाक,कान,घसा, मोतीबिंदू तसेच तिरडेपणा, स्त्रीरोग तज्ञ, अस्थिरोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मुतखडा, अशा विविध आजारांवर मार्गदर्शन करण्यात आले.
रुग्णांना मोफत मेडिकल गोळ्या औषधी देण्यात आले. हे आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन प्रभाकर चौधरी, सरपंच अक्षयकुमार जैस्वाल,अशोक बोरसे, शिवराम भडके,शौलेश पालिवाल, शरद अण्णा सोनार, सुनील क्षीरसागर, ग्रामसेवक गजानन काळे, ग्रामपंचायत सदस्य अमृत चौधरी, अर्जुन पाटील, सुरेश चौधरी ईश्वर देशमुख, आबा चौधरी, शांताराम चौधरी,राहुल कटारिया,संजय चौधरी ,भास्कर आंबेकर ,विजय चौधरी ,माजी सरपंच रमेश चौधरी,रमेश लिंगायत,किसन पाटील, डॉ सुभाष घोंगडे,डॉ विकास पालीवाल,अण्णा चौधरी, विशाल ठोसर,उमेश देशमुख,अनिल तडवी, भास्कर भोई,शरद कोळी, हितेश पालीवाल, गोपाल पाटील, अमोल पाटील विशाल खाटीक पत्रकार चंद्रकांत पाटील, रमेश शेळके, गजानन क्षीरसागर हे उपस्थित होते, गोदावरी फाउंडेशन व डॉ उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मदाय रुग्णालय डॉक्टर,परिचारक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.