<
शहादा – (प्रतिनिधी) – तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा केवडीपाणी येथे दिनांक 27/ 11/ 2024 रोजी माननीय गटशिक्षणाधिकारी श्री. डॉ. योगेशजी सावळे साहेबांनी भेट दिली . सोबत केंद्रप्रमुख श्री.नरेंद्र महिरे साहेब,श्री.सामुद्रे सर होते. भेटीचे औचित्य साधून प्रथम सत्कार करण्यात आला.व मुख्याद्यापिका श्रीमती.भारती चव्हाण मॅडम, प्रा.शिक्षक श्री.भगवान गढरी,शिक्षकांच्या स्वखर्चाने चिमुकल्यांचा थंडीपासून बचाव करण्यासाठी व विद्यार्थी थंडीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नाही यासाठी साहेबांच्या हस्ते स्वेटर वाटप करण्यात आले.
तसेच वर्ग भेटी घेऊन विद्यार्थ्यांना वाचन , लेखन व गणितीय क्रिया दिल्या.विद्यार्थ्यानी प्रतिसाद दिल्याबद्दल साहेबांनी समाधान व्यक्त केले. आणि विशेष म्हणजे साहेबांनी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले.तसेच दोन्ही शिक्षकांचे भरभरून कौतुक केले.व शालेय दप्तराचे सखोल मार्गदर्शन केले.तसेच मुख्यमंत्री कौशल्य शिक्षक श्री.झेलशिन वळवी, शालेय व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष श्री.दिनेश ठाकरे ,स्वयंपाकी श्रीमती.अनिता ठाकरे,श्रीमती जानुबाई पराडके व ग्रामस्थ उपस्थित होते.