<
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
जळगाव-(प्रतिनिधी) – जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव आणि नेहरू युवा केंद्र, जळगाव, भारत सरकारच्या युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत जिल्हास्तरीय युवा महोत्सव व विज्ञान मेळाव्याचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे करण्यात आले. या कार्यक्रमात विज्ञान मेळा, लोकगीत, लोकनृत्य, कविता लेखन, कथा लेखन, मोबाईल फोटोग्राफी, चित्रकला व भाषण स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेतील विजेते आणि १० युवा आयकॉन विभागीय स्तरावर जिल्ह्याचे नेतृत्व करतील. युथ आयकॉनची निवड ऑनलाइन पद्धतीने केली जाईल.
युवा उत्सवाचे उद्घाटन जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, डॉ.सुहास गाजरे, प्राचार्य शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या हस्ते करण्यात आले. प्रा.भूषण चौधरी, संचालक KCIIL, सोना कुमार, मुख्याध्यापक केंद्रीय विद्यालय, रवींद्र नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी आणि नरेंद्र डागर, जिल्हा युवा अधिकारी, नेहरू युवा केंद्र, जळगाव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. रवींद्र नाईक यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले तर नरेंद्र डागर यांनी युवकांना माय भारत आणि विकसित भारत प्रश्नमंजुषाविषयी मार्गदर्शन केले.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी देखील कार्यक्रमात भाग घेतला आणि विज्ञान मेळ्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांचा आढावा घेतला. तरुणांना संबोधित करताना, त्यांनी विविध महाविद्यालयातील तरुणांशी संपर्क साधण्यासाठी, नवनिर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि विकसित भारत २०४७ ची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सक्रिय भूमिका बजावण्यासाठी प्रोत्साहित केले. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व परीक्षकांचा सत्कारही केला.
कार्यक्रमात परीक्षक म्हणून डॉ.सुहास गाजरे, प्रा.भूषण चौधरी, पांडुरंग विठ्ठल महाले, सुरेश पांडुरंग सानप, संजय बबन जुमनाके, प्रसाद भानुदास देसाई, स्वाती अभयकुमार बराटे, सोना कुमार, सत्यनारायण राहुल पवार, गणेश पंडित सूर्यवंशी, गोपीचंद देविदास धनगर, श्रद्धा प्रकाश जोशी, विनोद दिगंबर ढगे, उल्हास शरद ठाकरे व ज्ञानेश्वर सोनवणे यांनी युवकांचे मूल्यमापन व मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे नियोजन क्रीडा अधिकारी डॉ.सुरेश थरकुडे यांनी केले. मीनल थोरात, क्रीडा अधिकारी, अजिंक्य गवळी, लेखापाल व कार्यक्रम सहाय्यक, नेहरू युवा केंद्र जळगाव व प्रसाद भानुदास देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मायभारतचे युवा स्वयंसेवक चेतन पाटील, रोहन अवचरे, मनोज पाटील, तुषार साळवे, साहिल साळवे, भावेश अंकमोल, रवींद्र बोरसे, परेश पवार आणि अक्षय निकम यांनी कौतुकास्पद सहकार्य केले.
विजेत्यांची यादी खालीलप्रमाणे :
विज्ञान मेळा एकेरी – 1. रुपाली योगेश पाटील 2. तीर्थ संजय घोष 3. वरद अनिल अहिरराव
विज्ञान मेळा गट – 1. नेहा मधुकर गुर्जर, SSBT कॉलेज 2. मिरज प्रदीप महाजन, SSBT कॉलेज 3. यश दीपक मोरे, शासकीय ITI भुसावळ
मोबाईल छायाचित्र – 1. समय अजय चौधरी 2. कुणाल विष्णू जाधव 3. साजन रोहिदास वळवी
चित्रकला – 1. समय अजय चौधरी 2. कुणाल विष्णू जाधव 3. अंतरा कृष्णा पाटील
भाषण – 1. जिज्ञासा गणेश पाटील 2. विवेक मनोज पाटील 3. वैष्णवी गणेश पाटील
कथालेखन – 1. पवन सुभाष सावकारे 2. ऐश्वर्या प्रल्हात पाटील 3. निशा राजेंद्र पाटील
सामूहिक लोकनृत्य – 1. कान्हा ललित कला केंद्र संघ 2. मुळजी जेठा महाविद्यालय संघ 3. वैचारिक कला मंडळ चाळीसगाव संघ
कविता लेखन – 1. रसिका मुकुंद ढेपे 2. सानिका पंकज पाटील 3. अनुकुल छाया माळी
समूह लोकगीते – 1. कान्हा ललित केंद्र जळगाव – पोतराज गीत 2. बोहरा सेंट्रल स्कूल पारोळा -पोवाडा 3. वैचारिक कला मंडळ चाळीसगाव – खंडोमा गीते
युवा उत्सवाच्या समारोप समारंभात सर्व विजेत्यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. नेहरू युवा केंद्र जळगाव व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव यांच्या वतीने विजेत्यांच्या बँक खात्यात रोख बक्षिसे वाटप करण्यात येणार आहेत.