<
जळगाव – (प्रतिनिधी) – येथील प्राध्यापक डॉ. उमेश वाणी राज्याचे मुख्यमंत्री यांना पत्र पाठवून मोटार वाहन कायद्यात दुरुस्ती करण्यासाठी सुचविले आहे.
सविस्तर वृत्त असे की, सोळा वर्ष पूर्ण असलेल्या व्यक्तींना १२५ सीसी(गिअरसह) पर्यंतचे दुचाकी वाहन चालविण्यास परवानगी देण्यात यावी. मोटार वाहन कायद्यात तशी दुरुस्ती करुन १२५ सीसी(गिअरसह) पर्यंतचे दुचाकी दुचाकी वाहन चालविण्याची परवानगी देण्याची तरतूद करण्यात यावी. सोळा वर्ष पूर्ण केलेल्या व्यक्तींची शारीरिक, वैचारिक, सामाजिक, मानसिक, प्रगल्भता, कौशल्य आणि समजूतदारपणा लक्षात घेऊन तसेच तंत्रज्ञानातील आधुनिक बदल, गतीशील युगातील गरज लक्षात घेऊन मोटार वाहन कायद्यात दुरुस्ती करण्यात यावी.
याबाबत शासनस्तरावर चर्चासत्र आयोजित करुन नागरीकांची मते जाणून घ्यावीत.
दुरुस्तीमुळे होणारे फायदे- १) विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी वाहन उपयोगाचे ठरेल. २) मोटार वाहन कायद्याअंतर्गत दाखल होणारे गुन्हे कमी होतील. ३) पालकांना होणारा त्रास कमी होईल. ४) वाहतूक पोलिस व शासनास होणारा त्रास कमी होईल असे प्रा.उमेश वाणी लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय, जळगाव यांनी निवेदनात म्हटले आहे.
(सदर निवेदन दि.४ डिसेंबर २०२४ रोजी ईमेल द्वारे मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना पाठविण्यात आले आहे)