<
जळगाव – (प्रतिनिधी) – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांव अंतर्गत जळगांव क्रीडा विभाग आंतर महाविद्यालयीन मैदानी (पुरुष व महिला) स्पर्धा २०२४ चे आयोजन खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालय जळगांव येथे दिनांक ०७ व ०८ डिसेंबर २०२४ रोजी करण्यात आले. यामध्ये जळगांव क्रीडा विभागातील एकूण २५ महाविद्यालयातील एकूण ४६० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
स्पर्धेचे उद्घाटन रामानंद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र गुंजाळ साहेब यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलन करून करण्यात आले. याप्रसंगी मू. जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन. भारंबे, क.ब.चौ.उ.म.विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील, के.सी.ई. सोसायटीचे संचालक श्री. प्रविणचंद्र जंगले, जळगांव क्रीडा विभागाचे सचिव डॉ. आनंद उपाध्याय, मू. जे. महाविद्यालयाचे क्रीडा संचलक, डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर याचबरोबर डॉ. नवनीत आसी, डॉ. पी. आर. चौधरी, डॉ. संजय चौधरी, डॉ. निलिमा पाटील, डॉ. अमोल पाटील, प्रा. सतीश कोगटा, प्रा. आर. जी. भालोदकर, प्रा. सागर सोनवणे, डॉ. पी. आर. गवळी, प्रा. सुभाष वानखेडे, डॉ. वीरेंद्र जाधव, डॉ. मुकेश पवार डॉ. महेश पाटील, डॉ. सी. पी. लभाने, प्रा. प्रणव बेलोरकर, प्रा. प्रविण कोल्हे, श्री. साधू तागड व जळगांव क्रीडा विभागातील सर्व महाविद्यालयांचे क्रीडा संचालक उपस्थित होते.
स्पर्धा उद्घाटनानंतर पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र गुंजाळ यांनी खेळाडूंना शपथ प्रदान केली. मू. जे. महाविद्यालयद्वारे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धेतील विजयी, उपविजयी व तृतीय स्थान पटकावणाऱ्या संघांना अनुक्रमे सुवर्ण, रजत व कांस्य पदक देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मू. जे. महाविद्यालयाचे क्रीडा संचालक तसेच स्पर्धा आयोजन प्रमुख डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर यांनी केले.