<
जळगाव – (प्रतिनिधी) – श्री स्वामीनारायण मंदिर प्राणप्रतिष्ठा महोत्सा अंतर्गत दिनांक १० डिसेंबर मंगळवार रोजी दुपारी ३.०० वाजेला शहरातील स्वातंत्र चौकातून आकर्षक भव्य पोथी शोभायात्रा निघणार आहे. स्वातंत्र चौक हेड पोस्ट नेरी नाका जुने जळगाव व कोल्हे विद्यालय नंतर कालिका माता मंदिराजवळ मिरवणुकीची सांगता होईल. सदर शोभा यात्रेत श्री स्वामिनारायण संप्रदायाचे समृद्ध सांस्कृतिक कार्यक्रम प्रदर्शनाचे चरित्र असेल. महिला व पुरुष पारंपारिक वेशभूषेत असतील. चार डीजे, 15 ट्रॅक्टर, 10 भजनी मंडळ, इस्कॉन भजनी मंडळ तीन लेझीम पथक दोनशे विद्यार्थ्यांचे, 15 ढोल पथक, 1000 महिलांची कलश यात्रा, ब्रह्मकुमारी यांच्या 600 महिलांचे भजनी मंडळ, ग्रामीण भागातील ३ सुशोभित बैल जोडी असेल. सदर सुशोभित ट्रॅक्टर वर राम लक्ष्मण हनुमानजी, श्रीकृष्ण विठ्ठल रुक्मणी यांचे सजीव पात्र असतील. शिवाय 20 आकर्षक भव्य हत्ती, मोर या प्राण्यांचे कट आउटयुक्त सुशोभित रथ हे या मिरवणुकीचे विशेष आकर्षण असेल.
सदर मिरवणुकीत पाच बग्गी यात वडताल येथिल कोठारी धर्मप्रसाददासजी स्वामी, शिवाय नौतमप्रकाशदासजी स्वामी अखिल भारतीय संत मंडळाध्यक्ष, गुरुवर्य गोविंद स्वामी जळगाव, संहिता पाठ संत, भागवत कथेचे वक्ता परमपूज्य पी पी स्वामी, हरिप्रकाश स्वामी रथावर विद्यमान असतील. याशिवाय श्री स्वामिनारायण संप्रदायाचे महान संत मंडळी दर्शन देतील.
जळगावच्या सर्व आबाल वृद्ध हरिभक्तांनी व नागरिकांनी सदर मिरवणूक पाहण्याकरता मार्गावर उपस्थित राहावे असे आवाहन नयनशास्त्री यांनी केले आहे.