<
कार्यकर्त्यांनी आजच साजरा केला आ. सुरेश भोळे (राजू मामा) यांचा विजयोत्सव
भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आर.पी. आय (A) रासप, शिवसंग्राम, रयत क्रांती, महायुतीचे अधिकृत उमेदवार व जळगाव शहराचे लोकप्रिय आ. सुरेश दामू भोळे (राजू मामा) यांनी आज जळगाव शहराच्या विधानसभेच्या उमेदवारीसाठी आज दि. ३ ऑक्टोंबर २०१९ गुरुवार दुपारी २ वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
दुपारी १२.३० वाजता ना.गिरीशभाऊ महाजन यांचे जि. एम फौंडेशन येथे आगमन होऊन भव्य रॅलीला सुरुवात झाली. महायुतीचे उमेदवार सुरेश भोळे (राजू मामा) यांच्या भव्य अशा महारॅलीला ढोल ताश्याच्या गजरात व फटाके फोडून सुरवात झाली. या रॅलीचा पुढे कोर्ट चौक, नेहरू चौक मार्गे जाऊन ठिकठिकाणी मा. ना. गिरीशभाऊ महाजन व आ. सुरेश भोळे (राजू मामा) यांचे व्यापारी वर्ग तसेच गणेश मंडळ, सर्व सामान्य जनतेकडून स्वागत करण्यात आले.
सदर रॅलीमध्ये मा. ना. गुरुमुख जगवानी, आ. चंदूभाई पटेल, शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख उदयजी सावंत, महापौर सीमाताई भोळे, उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, शिवसेना जिल्हा महानगर प्रमुख शरद तायडे, माजी महापौर नितीन लद्धा, ललित कोल्हे, R P I (A) चे जिल्हा अध्यक्ष आनंद बाविसकर,विभाग अध्यक्ष दीपक सपकाळे, महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल, तसेच रासप, शिवसंग्राम, रयत क्रांतीचे पदाधिकारी व जि. प. सभापती पोपटतात्या भोळे, स्थायी सभापती जितेंद्र मराठे, महिला सभापती मंगला चौधरी, शिवसेना मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, नितीन बरडे, मानसिंग सोनावणे व शोभाताई चौधरी तसेच RPI चे अशोक तायडे, नंदाताई बाविस्कर, भाजपा संघटन सरचिटणीस विशाल त्रिपाठी, दीपक सूर्यवंशी, राजेंद्र घुगे पाटील, महेश जोशी, दीपक साखरे, सचिन पानपाटील सर्व भाजपा जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, विविध आघाड्यांचे अधक्ष्य व भाजपा शिवसेनेचे सर्व नगरसेवक महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते या भव्य अश्या महा रॅलीमध्ये हजारोच्या संख्यने उपस्थित होते.
रॅली प्रसंगी भाजपा शिवसेना RPI (A) रासप शिवसंग्राम महायुतीचा विजय असो अश्या घोषणांनी परिसर दुमदुम गेला होता. महिला भगिनी फुगड्या खेळून आनोंदोत्सव साजरा करीत होत्या व राजू मामांचा ऐक प्रकारे आज विजय उत्सवच साजरा करीत होत्या. या रॅली मध्ये सहभागी होण्यासाठी सकाळी ९ वाजेपासून जि.एम. फौंडेशन येथे कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. रॅलीमध्ये जळगाव शहरातील सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय कायदे क्षेत्र , औद्योगिक, व्यापारी व गणेश महामंडळ, धार्मिक क्षेत्रातील, हॉकर्स बांधव तसेच राजू मामा मित्र परिवार व जळगावातील सर्वसामान्य नागरीकसुद्धा रॅलीमध्ये उपस्थितीत होते.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भाजपा कार्यालय (वसंत स्मृती) येथे आलेल्या सर्व महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे आ. सुरेश भोळे यांनी आभार व्यक्त केले.