Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

साडेसात एचपीपेक्षा जास्त क्षमतेच्या कृषी पंपांना वीजबिल माफी देण्याची आमदार अमोल जावळे यांची मागणी

"रावेर विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अमोल जावळे आक्रमक"

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/12/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read
साडेसात एचपीपेक्षा जास्त क्षमतेच्या कृषी पंपांना वीजबिल माफी देण्याची आमदार अमोल जावळे यांची मागणी

रावेर – (प्रतिनिधी) – नागपूर येथे महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले असून आज या अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. यावेळी विधानसभेत जळगाव जिल्ह्यातील रावेरचे आमदार अमोल जावळे यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर महत्त्वाचा मुद्दा मांडला. शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने साडेसात एचपीपेक्षा जास्त क्षमतेच्या कृषी पंप ग्राहकांना वीजबिल माफ करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, परंपरागत कृषी पंपांसाठी दिले जाणारे वीज कनेक्शन सोलर पंपांमुळे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे या सोलर पंपांना पुन्हा वीज कनेक्शन देण्यात यावे, अशी ठोस मागणी आमदार अमोल जावळे यांनी विधानसभेत केली.

विधानसभेत बोलताना आमदार अमोल जावळे यांनी सांगितले की, मागील काळात आपल्या युती सरकारने रावेर विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी वीजबिल माफी लागू केली आहे. साधारणतः साडेसात एचपीपर्यंतच्या कृषी पंपांना वीजबिल माफी देण्यात आली आहे. मात्र, माझ्या रावेर विधानसभा क्षेत्रात एकूण २९ हजार कृषी पंप असून त्यापैकी सुमारे २२ हजार कृषी पंप साडेसात एचपीच्या वर आहेत. अंडरग्राऊंड वॉटर टेबल (भूजल पातळी) खालावल्याने येथील शेतकऱ्यांना उच्च क्षमतेचे कृषी पंप वापरण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे खूप कमी शेतकऱ्यांना वीजबिल माफीचा लाभ मिळाला आहे.

विधानसभेत बोलताना आमदार अमोल जावळे यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. त्यांनी सांगितले की, सोलर पंप केवळ साडेसात एचपी क्षमतेपर्यंतच उपलब्ध करून दिले जातात. मात्र, भूजल पातळी २०० फूटांपेक्षा खाली गेल्यामुळे या सोलर पंपांचा शेतकऱ्यांना अपेक्षित फायदा मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने साडेसात एचपीपेक्षा जास्त क्षमतेच्या कृषी पंपांना वीजबिल माफी लागू करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.याशिवाय, परंपरागत कृषी पंपांना पूर्वी देण्यात आलेले वीज कनेक्शन सोलर पंपांमुळे बंद करण्यात आले आहे. ही स्थिती लक्षात घेता, त्या कृषी पंपांना पुन्हा वीज कनेक्शन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही आमदार अमोल जावळे यांनी यावेळी विधानसभेत केली.

अमोल जावळे हे रावेर मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडून आलेले आमदार आहेत. भाजपाने त्यांना प्रथमच उमेदवारी दिली होती, आणि त्यांनी आपल्या पहिल्याच निवडणुकीत विजय मिळवून विश्वास सार्थकी लावला.विधानसभा निवडणुकीनंतर त्यांचे हे पहिलेच अधिवेशन असून, या अधिवेशनात त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेत महत्त्वपूर्ण मागणी मांडली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

“अंतर्गत तक्रार समिती” मार्फत “महिला लैंगिक छळ विरोधी कायदा” या विषयावर कार्यक्रम संपन्न

Next Post

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात हेपेटायटिस बी लसीकरण उपक्रम

Next Post
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात हेपेटायटिस बी लसीकरण  उपक्रम

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात हेपेटायटिस बी लसीकरण उपक्रम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo