<
फैजपूर -(मलिक शाकीर)- यावल रावेर तालुक्यातील भूगर्भातील खालावलेली पाण्याची पातळी,शेतीपूरक उद्योग, तरुणांना रोजगार तसेच महिला सबलीकरण व आदिवासी ,अल्पसंख्याक या घटकांच्या हितासाठी आपण काम करणार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार शिरीष चौधरी यांनी केले . आज रावेर येथे त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला याप्रसंगी रावेर येथील आठवडे बाजार येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार रमेशदादा चौधरी हे होते यावेळी माजी आमदार शिरीष चौधरी यांनी सर्वप्रथम रावेर- यावल तालुक्याच्या विकासाच्या जडणघडणीत योगदान देणारे लोकसेवक बाळासाहेब मधुकरराव चौधरी,सहकार महर्षी जे टी महाजन, बळीराम बापू वाघूळदे, काकासाहेब राणे,भाऊसाहेब बोनडे, बाजीराव नाना पाटील, विश्वनाथ वामन पाटील, घ.का.पाटील ,सुमनताई पाटील,मनोहर लहू पाटील , पी वाय चौधरी, उखाभाई वासना, डिंगबर शेठ नारखेडे, गिरीधर शेठ भंगाळे, रामकृष्ण सिताराम पाटील, वजीर भाई तडवी, अब्बास भाई जमादार, दुलबा पाटील,विश्वनाथ शेठ चौधरी, त्र्यंबक श्यामजी चौधरी, निंबा दुला चौधरी अशा अनेक मान्यवरांचे स्मरण करून अभिवादन केले.भाजप सरकारने गेल्या पाच वर्षात मोठ मोठ्या गप्पा मारून लोकांना संभ्रमात टाकले अशी भाजपा सरकारवर तोफ डागली प्रत्येक्ष कृती केली नाही असेही यावेळी आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना ईडी चौकशीत गोवण्याचा निंदनीय प्रकार केला त्याचा शिरीष दादा चौधरी यांनी यावेळी निषेध केला व सांगितले की अवघा महाराष्ट्र पवार साहेबांच्या पाठीशी उभा आहे दरम्यान बाळासाहेबांनी या भागात धरणे करून आबादाणी केले हा वसा घेऊन आपण यावल व रावेर तालुक्यातील गेल्या चार वर्षासपासून खालावलेली भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी, गावागावात तरुणांना रोजगार निर्मिती,शेतकऱ्यांचे हित जोपासून आदिवासी व महिला सबलीकरण, अल्पसंख्याकांच्या हितासाठी आपण काम करणार आहे त्यासाठी रावेर मतदार संघाच्या विकासाचे काम करण्यासाठी मला आशीर्वाद रुपी मत देऊन संधी द्या या संधीचे सोने केल्याशिवाय राहणार नाही असे आश्वासन दिले दरम्यान काँग्रेस जिल्हाध्यक्ष संदीप भैय्या पाटील म्हणाले गेल्या पाच वर्षात भाजपा सरकारने घोषणा करण्याचा पाऊस लावला आहे देशात आर्थिक मंदी झाली आहे हे सरकार निष्क्रिय ठरले असून घराघरात पोहचून शिरीष दादा यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचे आवाहन केले माजी खा डॉ उल्हास पाटील यांनीही भाजपा सरकार अपयशी ठरल्याचा पाढा वाचत शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही,बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे तसेच देश स्वातंत्र्यासाठी योगदान दिले अशा चौधरी कुटुंबातील तिसरे वंशज व आपल्या हक्काचे उमेदवार शिरीष दादा चौधरी यांना निवडून आणण्याचे आवाहन केले माजी आमदार अरुण पाटील म्हणाले राजकीय वारसा व सुसंस्कृत घराण्यातील उन्नत व आपल्या हक्काचा उमेदवार शिरीष दादा यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याची त्यांनी ग्वाही दिली राजीव पाटील म्हणले विकासाची दृष्टी असलेला व सर्वसामान्यांचा कणव असलेला नेता शिरीष दादा आहे त्यामुळे असाच त्यांच्या सारखा लोकप्रतिनिधी विधानसभेत पाठविला पाहीजे त्यासाठी आपण सर्वांनी शिरीष दादा चौधरी यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे यानंतर रावेरचे नगराध्यक्ष दारा मोहंमद यांनी आपण व आपले समर्थक कार्यकर्ते शिरीष दादांसोबत असल्याची ग्वाही दिली आदिवासी नेते हमीद भायखा तडवी,एडव्हॉकेट एम ए खान, यांनीही मनोगतातून शिरीष दादांना निवडून आणण्याचे आवाहन केले.
व्यासपीठावर जिल्हा बँक उपाध्यक्ष आर जी नाना पाटील,बुऱ्हाणपूरचे माजी आमदार हमीद काजी राष्ट्रवादी काँग्रेसचे किसान सेल जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, नीलकंठ फिरके न्हावी,हाजी शब्बीर शेठ यावल, दिनू नाना पाटील,पी सी पाटील,रमेश दादा महाजन, मसाका संचालक लीलाधर चौधरी, नितीन व्यंकट चौधरी, भागवतराव पाचपोळे, नथु रमजान तडवी,अनिल महाजन,बारसु नेहेते,मसाका संचालिका सौ शैलताई चौधरी,अनिल महाजन, प्रशांत पाटील, संजीव महाजन,जिल्हा परिषद सदस्य सुरेखा पाटील, जि प सदस्य डॉ नीलम पाटील ,डॉ सुरेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य पुष्पा तायडे, पं स यावल चे गटनेते शेखर पाटील,पं स सदस्य दीपक पाटील,पं स सदस्य कलिमा तडवी,पंचायत समिती सदस्य सरफराज तडवी, पं स सदस्य प्रतिभा बोरोले,यावलचे माजी नगराध्यक्ष शशांक देशपांडे, रमेश नागराज पाटील,आदिवासी समाजसेवक रमजान तडवी, अर्जुन जाधव ,प्रकाश मुजुमदार,माजी पंचायत समिती सदस्य विलास तायडे,हेमंत पाटील, विठू महाजन संतोष पाटील विवरा, किशोर फालक हिंगोणा, सातोदचे सरपंच माजी सरपंच अनिल महाजन, रावेरचे उपनगराध्यक्ष असद भाई,रतन शेठ,सातोदचे माजी सरपंच अनिल पाटील, वडरी सरपंच नबाब तडवी, प्रकाश आनंदा पाटील, सचिन रमेश पाटील, रावेर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन राष्ट्रवादी काँग्रेस यावल तालुका अध्यक्ष मुकेश येवले, राष्ट्रवादी काँग्रेस रावेर तालुका अध्यक्ष नीलकंठ चौधरी, यावल शेतकी संघ संचालक अमोल भिरुड, फैजपूर सातपुडा अर्बनचे व्हाईस चेअरमन चंद्रशेखर चौधरी, माजी नगरसेवक शेख जफर तडवी, काँग्रेस अनुसूचित जाती विभाग राहुल मोरे,यावल तालुका आदिवासी सेल अध्यक्ष बशीर तडवी,प्रकाश रमेश पाटील,तसेच पी आर पी कवाडे गट रावेर व यावल तालुका अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना पदाधिकारी व संजू जमादार, दिलरुबाब तडवी,किरण नेमाडे,दामोदर महाजन,चंद्रकांत भंगाळे,सुनील महाजन,बन्सी गारसे , विनायक महाजन ,यशवंत धांडे,फैजपूर काँग्रेस गटनेता कलिम खां मण्यार, माजीउपनगराध्यक्ष केतन किरंगे,नगरसेवक देवेंद्र बेंडाळे,नगरसेवक प्रभाकर सपकाळे,मारुळचे माजी सरपंच सय्यद अकिलुउद्दीन, जावेद जनाब मारुळ, जनार्दन पाचपांडे,डी सी पाटील, डॉ राजेंद्र पाटील,पं स यावल चे गटनेते शेखर पाटील, गुणवंत टोंगळे, किशोर लक्ष्मण चौधरी,माजीनगरसेवक महेबूब पिंजारी,काँग्रेस फैजपूर शहर अध्यक्ष शेख रियाज, फैजपूर युवक काँग्रेस शहर अध्यक्ष शेख वसीम जनाब काँग्रेस आदिवासी सेल फैजपूर शहर अध्यक्ष वसीम तडवी, रावेर काँग्रेस शहर अध्यक्ष, यावल शहर काँग्रेस अध्यक्ष कदिर शेख,अनु जाती जिल्हा सचिव बबन तायडे, जिल्हा सरचिटणीस रामाराव मोरे,यावल तालुका अध्यक्ष शेखर तायडे,अनु जाती महिला जिल्हाध्यक्ष प्रतिभा मोरे ,सौ चंद्रकला इंगळे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे तसेच पी आर पी कवाडे गट रावेर व यावल तालुका अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या मेळाव्याला सातपुडाच्या कुशीतील आदिवासी, अल्पसंख्याक,शेतकरी,शेतमजूर हजारोंच्या संख्येने उपस्थित होते यावेळी महिला वर्गाची लक्षणिय उपस्थिती होती मेळाव्याचे प्रास्ताविक रोझोद्याचे आर के चौधरी यांनी केले तर सूत्रसंचालन नेहाताई चौधरी यांनी केले.
ललित रमेश पाटील लेवा भोरपंचायत चे युवा शाखेचे अध्यक्ष हे शिरीष दादा चौधरी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आवर्जून उपस्थित होते त्यांना व्यासपीठावर सन्मानपूर्वक बसविण्यात आले यावेळी लेवा समाज युवा वर्गासह उपस्थितांकडून त्यांचा टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले.
शिरीष दादा चौधरी हे उमेदवारी दाखल करण्यापूर्वी धनंजय शिरीष चौधरी यांच्यासह युवा वर्गाने प्रचंड मोटारसायकल रॅली काढून शक्ति प्रदर्शन केले व आणि उमेदवारी दाखल करण्यासाठी भव्यदिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली यात शेतकऱ्यांच्या पारंपरिक बैलगाड्याचे विशेष आकर्षण ठरले मिरवणूक मार्गावरील दर्गा स्थळी चादर चढविण्यात आली व पाराचा गणपती येथे दर्शन घेतले तसेच भव्य अशा रथावर शिरीष दादा सोबत मान्यवर विराजमान होते आणि हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांच्या उपस्थितीने रावेर शहर काँग्रेसमय झाले होते व घोषणाबाजीने परीसर दणाणून निघाला होता.