<
जळगांव(धर्मेश पालवे):- जिल्हा जागृत जनमंच चे संस्थापक मा शिवराम पाटील यांनी आपल्या प्रखर, लढाऊ,व सचोट कार्याने शहरात व ग्रामीण भागात एक वेगळी ओळख निर्माण केली असून जनमानसात त्यांच्या कार्याची नेहमीच चर्चा होत असते.शिवराम पाटील यांनी विविध भ्रष्टाचार उघड करून शासन प्रशासन दणाणून सोडले आहे.त्याच बरोबर स्थानिक नेते व पुढार्यांना आपल्या प्रखर बोली शैलीने बंड करून धारेवरही घेतले आहे.आज ता 3 रोजी ठीक 12 वाजता शिवराम पाटिल यांनी आपल्या समर्थक व जनमंच च्या सदस्यांसमवेत आपला विधानसभा निवडणूक उमेदवारी साठी अर्ज भरला. त्याच बरोबर जळगांव शहरात होणाऱ्या भ्रष्टाचार व अपहार बाबत,निवडक गंभीर समस्यांवर,राजकीय घुसखोरी,आणि जळगांव शहर विकासासाठी च्या भाकीत वर आपलं मत व्यक्त करून शहरातील तरुण,सुशिक्षित, नोकरदार, बुद्धिजीवींनी आपल्या या लढ्यासाठी सोबत येण्यासाठी व जळगांवच्या विकासासाठी व स्वप्नपूर्तीसाठी मतदान करा असं ही उपस्तीत जनसमुदायास सांगितले. अर्ज भरतांना डॉ सरोज पाटिल,मा ईश्वर मोरे,मा दिपककुमार गुप्ता, मा अनिल नाटेकर,धर्मेश पालवे,राकेश वाघ व अन्य मान्यवर व समर्थक उपस्तीत होते.