जळगाव, दि. 6 (जिमाका वृत्तसेवा) मराठी वृत्तपत्राचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील सर्वात पहिले ‘दर्पण’ वृत्तपत्र हे आज म्हणजेच 6 जानेवारी रोजी सुरु केले. यामुळे आजचा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात ‘पत्रकार दिन’ म्हणून साजरा केला जातो. जळगावातील जिल्हा माहिती कार्यालयात देखील ‘पत्रकार दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी जळगावचे माजी जिल्हा माहिती अधिकारी तथा नागपूरचे माहीती व जन संपर्क संचालक डॉ. गणेश मुळे, जळगावचे जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रसंगी प्रतिमेस पुप्षहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी श्री.विनोद पाटील, श्री. अतुल सोनवणे, श्री.प्रमोद भंगाळे, श्री.चेतन आहिरे. श्री. पंकज ठाकुर, श्रीमती.उषा लोखंडे , श्री. भुषण सोनवणे, श्री. भुषण पाठक, वैशाली पाटील उपस्थित होते.