जळगाव-( जिमाका )- जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद जळगाव व पंचायत समिती भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमानाने भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे भव्य पशु प्रदर्शन आज संपन्न झाले.
तालुकास्तरीय पशु प्रदर्शन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.प्रदीप झोड होते. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. वाहेद तडवी आणि मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून दूध सोसायटीचे संचालक अतुल झांबरे, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत पाटील, डॉ. शामकांत हिरे, डॉ. संजय खाचणे, डॉ. अनिल शिंदे, डॉ. सलीम तडवी उपस्थित होते.
पशु प्रदर्शनाच्या प्रस्ताविकात पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रशांत येवले यांनी सांगितले की, पशुप्रदर्शनाद्वारे ग्रामीण भागातील पशुपालकांना पशुसंवर्धनाविषयी सर्वांगीन माहिती मिळावी व पशुसंवर्धनाबाबत आवड निर्माण होऊन शाश्वत उत्पन्नाचे साधन म्हणून पशुपालनाकडे बघण्याची दृष्टी प्राप्त करून घेणे हा या पशुप्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे.
डॉ वाहेद तडवी यांनी जनावरांच्या व्यवस्थापनाबाबत व लसीकरणाबाबत सविस्तर माहिती सांगितली तर दुधाळ जनावरांची निवड कशी करावी. अझोला, हायड्रोपोनिक व बहुवार्षिक चारा पिकाची लागवड, उत्पादन बाबत सविस्तर माहिती नाचणखेडा येथील सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ संदीप पाटील यांनी सांगितली. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. पी.डी झोड यांनी जातिवंत सिद्ध वळूच्या रेत मात्रा वापरून कुत्रिम रेतन करावे व राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत योजनेचा लाभ घेऊन जिल्ह्यामध्ये उद्योजक बनावे असे आवाहन केले.
या पशु प्रदर्शनामध्ये आलेल्या पशूंचे गट तयार करून पशुसंवर्धन विभागाच्या निवड समितीने निवड करून बक्षीस वाटप करण्यात आले
यावेळी डॉ. आर एस जाधव, डॉ. सलीम तडवी, डॉ. अतुल नेहते, डॉ प्रशांत लोंढे, डॉ संतोष बढे, डॉ. विकास इंगळे, डॉ सतीश तायडे, डॉ हेमंत कुमावत, डॉ निलेश राणे, डॉ योगेश पाटील, डॉ प्रवीण चौधरी, डॉ बर्हाटे , डॉ प्रीती पाटील उपस्थित होते. तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ प्रशांत येवले, डॉ. दर्शना उभाड, योगेश पाटील व तालुक्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.