लोहारा येथील सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलीने मिळवले कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून मिळवले दोन सुवर्णपदक;यशाबद्दल सर्व स्तरातून होतेय पल्लवी चौधरीचे कौतुक
लोहारा ता.पाचोरा जि. जळगाव (रिपोर्टर ईश्वर खरे)
लोहारा येथील सर्वसामान्य शेतकऱ्याच्या घरातील मुलगी पल्लवी संदीप चौधरी हिने कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामधून B E CIVIL सिविल शाखेतून प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल दोन सुवर्णपदक मिळवले आहेत.
ही पदवी एसएसबीटी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग सिविल शाखेत (2024) झाली आहे.
हे दोन सुवर्णपदक 8 जानेवारी 2025 रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या 33 व्या दीक्षांत समारंभ अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी.पी राधाकृष्णन, प्रमुख अतिथी विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष प्राध्यापक एम जगदीश कुमार, कुलगुरू प्राध्यापक व्ही एल माहेश्वरी, यांच्या शुभहस्ते सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.
माझे आई-वडील व प्रोत्साहन देणारे नातेवाईक तसेच प्राचार्य पटनायक सर, सिविल हेड ऑफ डिपार्टमेंट डॉक्टर हुसेन सर, डॉक्टर प्रवीण शिरोडे सर, यांच्या मार्गदर्शनाने मला उंच भरारी घेता आली असे पल्लवी चौधरी हिने सांगितले. या दोन सुवर्णपदकांमुळे माझ्या लोहारा गावाचे नाव व परिवाराचे नाव मोठे झाले यात मला जास्त आनंद वाटत असल्याचे हे सुद्धा आवर्जून सांगितले. ग्रामीण भागातील मुली सुद्धा विद्यापीठातून प्रथम येऊ शकतात हीचे प्रमुख उदाहरण ग्रामीण भागात पल्लवी चौधरी यांनी दाखवून दिले आहे त्यामुळे भविष्यात ग्रामीण भागातील मुली सुद्धा हा आदर्श घेऊन नक्कीच प्राविण्य मिळवतील हे मात्र नक्की. हे यश मिळवल्या बद्दल सरपंच अक्षयकुमार जैस्वाल, अमृत चौधरी,ईश्वर देशमुख, आबा चौधरी, अशोक क्षिरसागर, देविदास जाधव, अर्जुन पाटील, सुरेश चौधरी, सुरेश मोरे, वि. का. सो. चेअरमन प्रभाकर चौधरी व सर्व संचालक पत्रकार दिनेश चौधरी, ईश्वर खरे, चंदु खरे, गजानन क्षिरसागर, कृष्णराव शेळके, आदिनी अभिनंदन केले. येथिल माजी सरपंच अमृत चौधरी व विद्यमान ग्रामपंचायत सदस्या कल्पना चौधरी यांची पुतनी आहे.