जळगाव- (प्रतिनिधी)- येथे स्वामी विवेकानंद व हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त संजीवनी स्पोर्ट्स असोसिएशन जळगाव व जिल्हा कराटे संघटना जळगाव यांच्यातर्फे राज्यस्तरीय खुल्या कराटे स्पर्धेचे आयोजन आज प. न. लुंकड कन्या शाळा येथे करण्यात आलेले होते या स्पर्धेचे उद्घाटन लोकसभेच्या लोकप्रिय खासदार स्मिताताई वाघ व जळगाव शहराचे लोकप्रिय लाडके आमदार राजू मामा भोळे यांच्या हस्ते सरस्वती माता, स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज व हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी प्रमूख पाहुणे म्हणुन सुनील वाणी, ॲड. अजय कोळी, निलेश सोनवणे, कल्पेश बेलदार, नितीन तायडे, उपस्थित होते सर्व मान्यवरांचे संघटनेचे अध्यक्ष शिरीष कुमार तायडे, भूषण लाड वंजारी, जोगिंदर मोर्य, दिगंबर महाजन, अजय काशीद, ज्ञानेश्वर पवार ,राजेश इंगळे, सत्यनारायण पवार, यांनी स्वागत केले तसेच या स्पर्धा वेगवेगळ्या वयोगटात घेण्यात आल्या या स्पर्धेचे बक्षीस वितरण शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भाऊ भंगाळे 18 महाराष्ट्र बटालियनचे सुभेदार मेजर सुरेश कुमार ,नूतन मराठा कॉलेजचे एनसीसी ए. एन. ओ. शिवराज पाटील , सुनील वाणी, आरोग्यदूत पितांबर भावसार,होमगार्ड चे तालुका समादेशक संजय पाटील तसेच ड्रॅगन स्पोर्टस् चे बी. आनंद कुमार यांच्या हस्ते करण्यात आले या स्पर्धेमध्ये फाईट प्रकारात प्रथम पारितोषक हे आर आर हायस्कूल ने पटकावले तर द्वितीय पारितोषिक शुभ कराटे क्लासेस यांनी पटकावले तसेच काताज प्रकारा मध्ये काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल यांनी प्रथम क्रमांक पटकाविला या स्पर्धेमध्ये पंच म्हणून विशाल मते, प्रवीण राव, यश पाटील, जोगिंदर मोरया ,आनंद मोरे ,यांनी काम पाहिले स्पर्धा यशस्वीतेसाठी आज दिव्या सोनार, पूर्वा सोनवणे ,करिष्मा अहिरे, मोहिनी कोळी, दीक्षा इंगळे, सिद्धांत वाणी यांनी परिश्रम घेतले.