जळगाव-(प्रतिनिधी) – येथील आधार जेष्ठ नागरिक संघाचे नवीन इमारतीत प्रमुख पाहुणे श्री रवींद्र भैय्या साहेब पाटील,अध्यक्ष डॉ संभाजी देसाई, श्री झुलाल पाटील व मोहन खैरनार विजय चव्हाण यांचे स्वागता नंतर प्रथम श्री.रवींद्र भैय्यासाहेब यांनी गुलाल नारळ वाढवून पूजा केली. डाॅ. संभाजी देसाई यांनी प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण केले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली सचिव प्रकाश पाटील यांनी प्रास्तावि केले श्री.रवींद्र पाटील यांनी सर्वांचे स्वागत करून संघाच्या कामाचे कौतुक केले.ज्येष्ठांना काळजी घेण्याचे सांगत शुभेच्छा दिल्या.
डॉ.संभाजी देसाई यांनी संघात अभ्यासिका ग्रंथालय कॅरम व्यायाम इन्स्ट्रुमेंट पुढील काळात आणणेचे सांगून ज्येष्ठांना आनंदी जीवन जगण्याचे सल्ले दिले यावेळी रामकृष्ण पाटील व रघुनाथ बोरोले यांचा वाढदिवस निमित्त गौरव करण्यात आला.संघाचे संचालक बळवंतराव चव्हाण पंढरीनाथ साळुंखे डॉ निंबाळकर,नामदेव पाटील,शेखर पाटील,मोरे सर,विजय देसाई,शांताराम पाटील,अनिल गरुड तसेच परिसरातील सदस्य उपस्थित होते. मोहन खैरनार यांनी आभार प्रदर्शन केले चहा पाणी देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.