<
आताच्या तरुणांमध्ये आदराने घेतलेलं नाव रवी भाऊ…
जळगांव-(धर्मेश पालवे)-राजकारणात का? कश्यासाठी? कोणासाठी? जिथे अन्याय होत असेल कोणावर तर लगेच त्या व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी कुठलही वेळ न बघता धावून जाणे म्हणजे रवी भाऊ देशमुख.कोणत्याही ठिकाणी कामे जर होत नसतील तर लगेच त्या कामाची विल्लेवाट लावणे, आज सरकारी योजना त्यांनी काही गावातील असंख्य लोकांचा योजनेद्वारे फायदा करून दिला, जिल्हा परिषद सदस्य त्यांच्या पत्नी कडून काही सरकारी आणि स्वखर्चाने गावातील समस्या पाणी, रस्ते, शाळेतील मुलांना शालेय पुस्तक मोफत, दफ्तर,पेन दिले कुठला व्यक्ती आहे जो जिल्हा परिषद सदस्य असताना इतकं सारे काम करेल. हॉस्पिटल च काम असेल असे असंख्य काम करून जनमानसात नावाजलेले व्यक्तीमत्व आहे. तसेच जिल्ह्यातील विद्यमान जिल्हा परिषद सदस्य पल्लवी देशमुख यांचे पती तथा सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र उर्फ रवीभाऊ देशमुख यांनी जळगांव जिल्ह्यात व ग्रामीण भागात आपल्या सामाजिक कार्याचा एक वेगळाच ठसा उमटवला असून, नागरिकांच्या विविध समस्या व प्रश्नाना सोडवले आहेत. सामजिक छावा संघटन माध्यमातून शहरात व ग्रामीण भागात जवळजवळ सर्वच ठिकाणी संघटन वाढवतं जनसंपर्क वाढवत शाखा खोलून नित्य समाजसेवा करत आहेत. त्याच बरोबर पत्नी पल्लवी देशमुख यांच्या सोबत जिल्ह्यतील विविध बाबीवर लढा दिला आहे.व ग्रामीण लोकांच्या अडी अडचणी समजून घेत न्यायोचित कार्य केले आहे,कोणत्याही तराजुत न बसता समाजसेवी व्रताला मी खरा उतरून समाजसेवा करणार असून, जनसेवेचे व्रत उरण करणार असल्याचं त्यांनी सांगत, मी जळगांव जिल्हा ग्रामीण मधून अपक्ष लढाई लढनार आहे, त्या साठी विधानसभा निवडणूक अर्ज हा धरणगाव मध्ये भरणार आहे असं मा. जितेंद्र देशमुख यांनी सत्यमेव जयतेच्या प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले.