जळगाव-(प्रतिनिधी) – येथील धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय, जळगाव यांना विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी), नवी दिल्ली यांच्याकडून स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा नुकताच प्रदान करण्यात आला आहे. या यशामुळे हे महाविद्यालय महाराष्ट्रातील समाजकार्य शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांपैकी स्वायत्ततेचा दर्जा मिळवणारे तिसरे महाविद्यालय ठरले आहे.
ही मान्यता मिळणे म्हणजे संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वाटचालीला मिळालेला एक मोठा सन्मान असून, यामुळे महाविद्यालयासाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी अनेक नव्या संधींचे दार खुले झालेली आहेत.
महाविद्यालयाची स्थापना १९९६ साली कै. मधुकरराव चौधरी यांच्या नेतृत्वाखाली, गांधी विचारधारेतून आणि समाजबांधणीच्या ध्येयातून करण्यात आली. या २८ वर्षांच्या वाटचालीत महाविद्यालयाने अनेक शैक्षणिक, सामाजिक आणि नवोन्मेषी उपक्रमांद्वारे आपल्या कार्याची छाप संपूर्ण महाराष्ट्रात उमटवली आहे.
या महाविद्यालयास यापूर्वीही संस्थेच्या आणि महाविद्यालयाच्या १९ व्या वर्षी म्हणजेच २०१५ साली नॅक च्या पहिल्या प्रयत्नात महाविद्यालयाने अ मांनाकन दर्जा प्राप्त केला होता. तद्वंतर क. ब. चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे उत्कृष्ट महाविद्यालय, नॅक कडून + ग्रेड (सीजीपीए ३.४६) महाराष्ट्रातील
सर्वाधिक, रुसा अंतर्गत दोन कोटींचे अनुदान, आणि स्वायत्त संस्थेकडून “ए” ग्रेड यांसारख्या यशांनी महाविद्यालयाची प्रगती सदैव उल्लेखनीय ठरली आहे.
स्वायत्ततेचा दर्जा मिळाल्याने आता महाविद्यालयास नवीन व्यावसायिक आणि अर्ध-व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करण्याची मुभा मिळणार आहे. यामुळे स्थानिक व ग्रामीण प्र भागातील विद्यार्थ्यांना अधिक रोजगाराभिमुख व व उद्योगाभिमुख शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध म होणार आहे. या यशामध्ये संस्थेचे अध्यक्ष, प्राचार्य, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, त विद्यमान विद्यार्थी, माजी विद्यार्थी, पालकवर्ग यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हे स्वप्न साकार झाले आहे, असे समाजकार्य महाविद्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.