<
जळगांव(प्रतिनिधी)- एका बाजूने हजारो वर्षापासून सुसंस्कृतपणाची आपल्या देशाची परंपरा सांगणार्या देशात आता स्त्रियांवरील अत्याचारांची परंपरा जणू जन्माला घातली जात आहे. प्रत्येकाने विचार करण्यासारखीच अशी ही बाब आहे.समाजात महिलांवर होणारे अत्याचार अजूनही संपलेले नाहीत. हुंडाबळी, मानसिक, शारीरिक छळ, भेदभाव आदींच्या माध्यमातून स्त्रीयांवर होणारे अन्याय, अत्याचार सुरूच आहेत. महिलांवर होणार्या अत्याचाराचं केवळ सासर हेच केंद्र नाही, तर मुलीच्या जन्मापासूनच ती नको म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं. एक काळ असा होता पुरुष प्रधान संस्कृतीत असणारा स्त्री चा दर्जा आणी त्यातुनही काही सशक्त विचारांच्या स्त्रियाचं झालेले समाजाला दर्शन ज्यात जिजाबाईंनी स्वराज्याचे रक्षक छत्रपती शिवाजी महाराज घडवले.मधल्या काळात स्त्रीचे अस्तित्व सशक्त केले ते सावित्रीबाईंनी म्हणून आज उच्चशिक्षित महिला दिसत आहेत. पण सध्या समाजात महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याच अनुषंगाने “बंधन प्रोडक्शन” ने नवरात्रीच्या मुहर्तावर एक “नारी तुझे रुप” या गाण्याचा नुकताच अल्बम तयार केला असून, हा अल्बम त्यांनी समाज जागृती साठी तयार केला आहे. सध्या सर्वत्र नवरात्रोत्सव उत्साहात सुरू आहे. तसेच महिला वर्गाचा हा उत्सव फार आवडीचा आहे. कारण हाच एकमेव उत्सव आहे की, याच नवरात्रोत्सवात फक्त ९दिवस महिलांना सन्मानाने पाहिलं जातं. पण बाकीचे ३५६ दिवस काय? हेच या अल्बम गाण्यामध्ये दाखवण्यात आले आहे. कि महिला ह्या फक्त नवरात्रीचे ९दिवस देवीचे रुप नसून ते कायम आहे व महिलांना नेहमी समाजात सन्मानाने पाहिले पाहिजे हेच या अल्बम गाण्याचा माध्यमातून समाजाला सांगण्यात आले आहे. तसेच या नव्याने तयार झालेल्या अल्बम गाण्याला समाजातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे बंधन प्रोडक्शन हेड यांनी यावेळी सांगितले. महिलांची खरी परीस्थिती दाखवणारे गाणं “नारी तुझे रुप” ह्या अल्बम मधून सामाजिक संदेश पोहचवणारी टीमची कामाची दखल घेत त्यांना आपल्या समाज जागृतीसाठी केलेल्या कामाची पावती देण्याचं काम सामाजिक कार्यकर्त्या अन्याय अत्याचार निवारण समितीचे जिल्हा अध्यक्षा सुचित्राताई महाजन, एमायडीसी चे पो.नी.रणजीत शिरसाठ, अभय शिंदे, स्वामी पाटील,निखिल खटकर यांनी केले. यावेळी रणजीत शिरसाठ यांनी या कलाकारांना शुभेच्छा दिल्या.यावेळी ह्या अल्बम मध्ये पात्र करणारी संपूर्ण टीम उपस्थीत होती. अरुण चव्हाण,विशाल राठोड,संजू राठोड,भूषण चिंचोरे, प्रवीण लाड,हर्षाली ठाकरे,निशा पाटील, आदी यावेळी उपस्थित होते. तसेच हा व्हिडिओ आपल्याला Sanju Rathod SR या युट्यूब चॅनेलवर पाहायला मिळणार आहे.