जळगाव – (प्रतिनिधी) – येथील लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयातील प्रा. डॉ. उमेश वाणी यांची मध्यप्रदेशच्या केंद्रीय अभ्यास मंडळावर समाजकार्य विषयात सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मध्यप्रदेश विश्वविद्यालय अधिनियम 1973 नुसार आयुक्त, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, भोपाळ यांनी 34- A3(iv)या नियमान्वये प्रा. डॉ उमेश वाणी यांची केंद्रीय अभ्यास मंडळावर समाजकार्य विषयात सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे.
सद्यस्थितीत महाराष्ट्रातील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथे समाजकार्य अभ्यास मंडळावर कार्यरत आहेत.
अभ्यास मंडळ हे शैक्षणिक संस्था, विद्यापीठ, महाविद्यालये, प्रशाळा इत्यादी मध्ये अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धती संबंधित महत्त्वपूर्ण कार्य करतात. या मंडळाचे प्रमुख कार्य अभ्यासक्रमाची रचना करणे, त्याचे नियंत्रण ठेवणे, तसेच विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि गुणवत्तेचे मूल्यांकन करणे हे आहे.