Friday, June 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मुलींच्या गटात महाराष्ट्रातील क्रिशा जैनची आघाडी;राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेतून उद्याचे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू घडणार, डॉ.भावना जैन यांचा विश्वास 

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/08/2025
in क्रीडा, राज्य
Reading Time: 1 min read
मुलींच्या गटात महाराष्ट्रातील क्रिशा जैनची आघाडी;राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेतून उद्याचे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू घडणार, डॉ.भावना जैन यांचा विश्वास 

जैन हिल्स येथे ३८ व्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत चाल खेळत उद्घाटन करताना डॉ.भावना जैन, सोबत नंदलाल गादिया,   देवाशीष बरुआ.

जळगाव (प्रतिनिधी ) – जैन हिल्सच्या अनुभूती मंडपम येथे सुरु असलेल्या ३८ व्या राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत जोरदार चुरस निर्माण झाली आहे. स्पर्धेत शुक्रवारी शेवटची फेरी खेळली जाणार असून विजेतेपदासाठी खेळाडूंमध्ये अटीतटीची लढत सुरु आहेत. मुलांमध्ये दिल्लीचा अरिहत कपिल याने आठ गुण घेत आघाडी घेतली आहे. त्याला ७.५ गुणांसह महाराष्ट्राचा आर्यन मेहता, मनी सरबातो (पश्चिम बंगाल), वोनिश्चिक मंडल (पश्चिम बंगाल) लढत देत आहेत. मुलींमध्ये महाराष्ट्राची क्रिशा जैन हिने आघाडी घेतली आहे. तिच्यासमोर वंशिका (दिल्ली) आणि जानकी (केरळ) यांनी आव्हान उभे केले आहे.

 

मुलांच्या लढती अशा रंगल्या

जैन हिल्स येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत ३९२ मुले आणि १७७ मुली सहभागी झाल्या आहेत. त्यांच्यात पहिल्या दिवसांपासून जोरदार लढती सुरु आहेत. स्पर्धेतील नववी फेरी रंगतदार झाली. आघाडीवर असलेल्या खेळाडूंचे सामने अनिर्णित राहिले. पश्चिम बंगालमधील मनी सरबातो आणि अरहित कपिल यांचा सामना बरोबरीत सुटला. यामुळे कपिल याचे आठ गुण झाले तर मनी सरबातो ७.५ गुणांवर आहे. महाराष्ट्राचा अद्वित अग्रवाल आणि पश्चिम बंगालचा अवरित चव्हाण यांच्यातील नवव्या फेरीतील  सामनाही बरोबरीत राहिला. कर्नाटकमधील अभिनव आनंद आणि महाराष्ट्रातील अविरत चौहान यांचा लढतीचाही निकाल लागला नाही. तो सामनाही बरोबरीत राहिला. परंतु महाराष्ट्राचा आर्यन मेहता याने तेलंगणातील नदोष शामल याचा पराभव करत स्पर्धेत चुरस कायम ठेवली. पॉडिचेरी येथील राहुल रामकृष्ण आणि गुजरातमधील विहान यांची लढतसुद्धा बरोबरीत राहिली. पश्चिम बंगालमधील वोनिश्चिक मंडल याने धुव्र गुप्ता याचा पराभव केला.

 

 मुलींच्या गटात महाराष्ट्रातील क्रिशासमोर आव्हान

मुलांप्रमाणे मुलींच्या गटात नवव्या फेरीअखेर चांगलीच चुरस आहे. महाराष्ट्रातील क्रिशा जैन हिने ८ गुण घेत विजेतेपदाकडे एक पाऊल पुढे टाकले आहे. क्रिशा हिने नवव्या फेरीत केरळमधील दिवी बिजेस हिला पराभूत केले. समीहा (तेलंगणा) आणि वंशिका रावल (दिल्ली) यांच्या लढतीत वंशिका विजयी झाली. तेलंगणातील अलाहिमा हिचा केरळमधील जानकी एस डी हिने अटीतटीच्या लढतीत पराभव केला. महाराष्ट्रातील क्रिशा ही ८ गुणांसह आघाडीवर आहे तर वंशिका आणि जानकी ७.५ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

कौशल्य दाखवण्याचे सर्वोत्कृष्ट व्यासपीठ-डॉ.भावना जैन

गुरुवारी सकाळच्या सत्राचे उद्घाटन कांताई नेत्रालयाच्या प्रमुख डॉ.भावना जैन यांनी बुद्धिबळाच्या पटावरील चाल खेळत केले. यावेळी खेळाडूंसोबत संवाद साधताना त्यांनी सांगितले की, देशभरातून आलेले सर्व खेळाडू जैन हिल्य येथे सुरु असलेल्या बुद्धिबळ स्पर्धेचा आनंद घेत आहेत. तुमच्यातील काही जण उद्याचे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू होणार आहेत. देशातील नामांकीत बुद्धिबळपटू तयार होणार आहे. त्यासाठी तुमच्यात असलेले कौशल्य दाखवण्याचे हे सर्वोत्कृष्ट व्यासपीठ तुम्हाला मिळाले आहे. त्याचा पुरेपुर लाभ घ्या, असे आवाहन डॉ.भावना जैन यांनी केले.  उद्घाटन प्रसंगी जळगाव बुद्धिबळ संघटनेचे सचिव नंदलाल गादिया, मुख्य पंच देवाशीष बरुआ उपस्थित होते. स्पर्धेसाठी अरविंद देशापांडे, प्रविण ठाकरे, रवी धर्माधिकारी, संजय पाटील परिश्रम घेत आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

क्लिनिकल रिसर्चमधील गुड क्लीनिकल प्रॅक्टिस (जीसीपी) चांगल्या वैद्यकीय पद्धतीचे मूलतत्त्व विषयकावर चर्चा कार्यशाळा उत्साहात

Next Post

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह व संत एकनाथ मागासवर्गीय वसतिगृहाचा उदघाट्‌न सोहळा संपन्न

Next Post
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह व संत एकनाथ मागासवर्गीय वसतिगृहाचा उदघाट्‌न सोहळा संपन्न

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह व संत एकनाथ मागासवर्गीय वसतिगृहाचा उदघाट्‌न सोहळा संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo