<
जळगांव(प्रतिनिधी)- तालुक्यातील आव्हाने शिवारातील श्री समर्थ प्राथमिक विद्यामंदिर या शाळेत विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास व्हावा या उद्देशाने व नवरात्र उत्सव निमित्ताने विविध अभ्यासपूरक स्पर्धा फूल मोजुन माळा बनविणे, हस्ताक्षर स्पर्धा,बौधीक स्पर्धा,जनेरल नॉलेज,अश्या विविध स्पर्धा घेण्यात आले.या स्पर्धेत १ली ते ७ वी च्या २०० विद्यार्थ्यानी या स्पर्धेत सहभाग घेतला.विद्यार्थ्यांचे गट नुसार वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आले.स्पर्धेत विजयी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य बक्षीस वितरण करण्यात आले.या वेळी उपस्थित विद्यार्थी,माता पालक यांच्यासाठी दांडिया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.स्पर्धेचे परीक्षक म्हणून संगीता देशमुख व प्रज्ञा बाविस्कर यांनी काम पाहिले.संस्था अध्यक्ष मनोज पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका हर्षाली पाटील यांचे यावेळी मार्गदर्शन लाभले.सूत्रसंचालन सद्दाम तडवी आभार प्रदर्शन जयश्री पाटील यांनी केले.राहुल पाटील, मोहिनी सुरवाडे, चैताली पवार आदींचे सहकार्य लाभले.