Saturday, March 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आयटीसी संगीत रिसर्च अकादमीच्या संगीत महोत्सवाचे जळगावी आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/10/2025
in जळगाव
Reading Time: 1 min read
आयटीसी संगीत रिसर्च अकादमीच्या संगीत महोत्सवाचे जळगावी आयोजन

 

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान अभिजात संगीतात कार्य करणारे प्रतिष्ठान म्हणून कान्हदेशच्या रसिकांना सुपरिचित आहे. गेली २३ वर्षे बालगंधर्व संगीत महोत्सवाच्या आयोजनामुळे अवघ्या भारतभर पोहोचलेल्या या प्रतिष्ठानाला अभिजात संगीताच्या क्षेत्रात मनाचे स्थान प्राप्त झाले आहे. प्रतिष्ठानचे देशभरातील अनेक प्रतिथयश संस्थान बरोबर कोलॅबोरेशन आहे. त्याचाच एक भाग म्हणून संपूर्ण भारत वर्षात सुपरिचित असलेली कोलकात्याची ITC संगीत रिसर्च अकादमी यांच्यासोबत प्रतिष्ठानचे नुकतेच कोलॅबोरेशन झाले असून दोन दिवसांचे मिनी संगीत संमेलनाचे आयोजन प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
हे संमेलन शनिवार व रविवार दि. १ व २ नोव्हेंबर २०२५ रोजी भैय्यासाहेब गंधे सभागृहात संध्याकाळी ७ ते १० या वेळेत संपन्न होणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन व दीप प्रज्वलन जळगावच्या खासदार स्मिता वाघ, ITC चे गुरु पं. ओंकार दादरकर यांच्या हस्ते होईल.

दोन दिवसीय या संगीत संमेलनात ITC चे दोन स्कॉलर विद्यार्थी व दोन प्रतिथ यश कलावंत सहभागी होणार आहे.
प्रथम दिवशीच्या प्रथम सत्रात स्कॉलर कौस्तव रॉय याचे सरोद वादन होईल त्याला तबल्याची साथ रमेंद्र सिंग सोलंकी करतील. दुसरे सत्र अकादमीचे गुरु व प्रतिथयश गायक पं. ओंकार दादरकर यांचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन होईल. त्यांना तबल्याची साथ युवा आश्वासक तबला वादक तेजोवृष जोशी तर संवादिनी साथ अनंत जोशी करतील.
रविवार अर्थात दुसऱ्या दिवशी च्या कार्यक्रमाची सुरवात आपल्या जळगावच्या युवा कलाकार नुपुर चांदोरकर-खटावकर व आर्या शेंदुर्णीकर यांच्या कथक व गुरूवंदनेने होईल. त्यानंतरचे दुसरे सत्र स्कॉलर अनुभव खामारू यांच्या शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनाने संपन्न होईल. त्यांना तबल्याची साथ तेजोवृष जोशी तर संवादिनीची साथ अनंत जोशी करतील. या संगीत संमेलनाचा समारोप होईल.
अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली
यावेळी दीपक चांदोरकर, अरविंद देशपांडे, शरदचंद्र छापेकर, दीपिका चांदोरकर, नुपूर खटावकर
उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

स्वर्गीय मित्राच्या आठवणीत जीपीएस गृपने दत्तक घेतली पाळधीतील स्मशानभूमी

Next Post

सामाजिक परिवर्तनाचा वारसा समृद्ध करु या ! – डॉ. फडणवीस

Next Post
सामाजिक परिवर्तनाचा वारसा समृद्ध करु या ! – डॉ. फडणवीस

सामाजिक परिवर्तनाचा वारसा समृद्ध करु या ! - डॉ. फडणवीस

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d