Thursday, July 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

स्वर्गीय मित्राच्या आठवणीत जीपीएस गृपने दत्तक घेतली पाळधीतील स्मशानभूमी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/10/2025
in जळगाव, सामाजिक
Reading Time: 1 min read
स्वर्गीय मित्राच्या आठवणीत जीपीएस गृपने दत्तक घेतली पाळधीतील स्मशानभूमी

पाळधी-(प्रतिनिधी) – मैत्रीचा खरा अर्थ म्हणजे एकमेकांसोबत असणं, फक्त आनंदात नाही तर आठवणींतही. त्या भावनेला साजेसं उदाहरण ठरलं आहे जीपीएस ग्रुप मित्र परिवाराचं एक अनोखं कार्य. जीपीएस मित्र गृपचे सक्रिय सदस्य स्व. अनिल आत्माराम महाजन यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त या जीपीएस गृपने एक आगळंवेगळं आणि समाजाभिमुख पाऊल उचलत पाळधी गावातील स्मशानभूमी दत्तक घेऊन तिच्या सुशोभीकरणाचा निर्णय घेतला आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात अल्पशा आजाराने अनिल महाजन यांचं निधन झालं होतं. त्या काळात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू होती. मात्र त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वत्र हळहळ व्यक्त झाली आणि त्या दिवशी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी निवडणुकीचं संपूर्ण प्रचारकार्य थांबवलं होतं.

आज त्या घटनेला वर्ष पूर्ण झालं असून, जीपीएस गृपने पारंपरिक कार्यक्रम, सत्कार वा सोहळा न करता समाजासाठी काहीतरी चिरंतन करण्याचा निर्धार केला. त्यातूनच पाळधीतील स्मशानभूमी दत्तक घेण्याचा आणि तिच्या स्वच्छता, रंगरंगोटी, पिण्याच्या पाण्याची सोय, प्रकाशव्यवस्था, बसण्याची व्यवस्था आदी सुविधा निर्माण करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

स्व.अनिलभाऊंनी आयुष्यभर माणसांमध्ये आपलेपणा जपला. त्यांच्या स्मृतीतून आम्ही समाजासाठी काहीतरी चांगलं घडवायचं ठरवलं आहे. स्मशानभूमीचं सुशोभीकरण म्हणजे गावाच्या संवेदनशीलतेचा भाग आहे, असं जीपीएस गृपचे प्रताप गुलाबराव पाटील यांनी सांगितलं.

या उपक्रमामुळे पाळधी गावात आता स्मशानभूमी स्वच्छ, आकर्षक आणि सुविधायुक्त होणार आहे. जीपीएस मित्र परिवाराने उचललेलं हे पाऊल केवळ मित्राच्या आठवणींचा सन्मान नाही, तर मैत्रीच्या नात्यातून समाजसेवेचा अर्थ अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न आहे. अशा भावनिक उपक्रमांमुळे गावात संवेदनशीलतेची नवी परंपरा रुढ होत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

“फेम” आयोजित स्पर्धेत पालवी जैनच्या ” स्वदेशी खरेदी करा” आर्ट वर्कला प्रथम पुरस्कार!

Next Post

आयटीसी संगीत रिसर्च अकादमीच्या संगीत महोत्सवाचे जळगावी आयोजन

Next Post
आयटीसी संगीत रिसर्च अकादमीच्या संगीत महोत्सवाचे जळगावी आयोजन

आयटीसी संगीत रिसर्च अकादमीच्या संगीत महोत्सवाचे जळगावी आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव

स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव

टॅलेंट सर्च व द्वारकाई ब्लास्टर्सचा विजयी सलामी; पंकज महाजन आणि मनोज पाटील सामनावीर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo