<
जळगाव – (प्रतिनिधी) – अनिल पितांबर वाघ यांनी ‘आम आदमी’पार्टीकडे उमेदवारी मिळणे बाबत मागणी केली होती. ‘आप’ देखील यांच्या उमेदवारीची घोषणा लवकरच करणार होते. परंतु महाराष्ट्रात आम आदमी पक्ष प्रथमच विधानसभेची निवडणूक लढवीत असल्याने पक्षश्रेष्ठींनी महाराष्ट्रात 55 जागा लढविण्याचे उद्दिष्ट निश्चित केले.
आम आदमी पक्षाने 55 जागा लढविण्याचे ठरविले असता प्रत्यक्षात मात्र 24 जागा घोषित केल्या. आम आदमी पक्ष आपली उमेदवारी जाहीर करेल या अपेक्षेने अनिल वाघ यांनी आप पक्षाकडून निवडणूक लढविण्याचे ठरविले होते. आपली उमेदवारी निश्चित जाहीर होईल या अपेक्षेने अनिल वाघ यांनी पहिल्याच दिवशी अनामत रक्कम भरून आप पक्षाकडून उमेदवारी करणेबाबत नाम निर्देशन अर्ज घेतले होते.
आम आदमी पक्षा कडून फक्त काही जागा लढविले जाणार असल्याचे समजताच आम आदमी पक्षाने जळगाव जिल्ह्यातून किमान जळगाव शहरातून आप पक्षाचा एक तरी उमेदवार घोषित करून निवडणूक लढवावी यासाठी पक्षाकडे प्रयत्न केला. डॉक्टर सूनील गाजरे यांनी पक्षाकडे पक्षश्रेष्ठींकडे व व निवड समितीकडे अनिल वाघ यांच्या उमेदवारीबाबत अट्टाहास केला. अनिल वाघ यांच्या उमेदवारीच्या बाबत जळगाव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष रईस खान यांनी पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीबाबत व जिल्ह्याच्या प्रतिनिधित्व बाबत मागणी केली.
आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र राज्य प्रभारी दुर्गेश पाठक व धनंजय शिंदे आणि युवा अध्यक्ष अजिंक्य शिंदे यांच्या संपर्कात राहून जळगाव जिल्ह्याला एक तरी जागा द्यावी याबाबत विनंती केली. जळगाव शहराचे महानगराध्यक्ष योगेश हिवरकर यांनी कार्यकर्त्यांमध्ये उस्फूर्तपणे सहभाग घेऊन पक्षाला नवचैतन्य निर्माण करून दिले होते. योगेश भोई यांनी कार्यकर्त्यांना पक्षाकडे सहभागी होण्याचे आवाहन केले होते. आम आदमी पार्टीचे संघटन व कौशल्य वाखाणण्याजोगे होते. सर्वसामान्य उमेदवार म्हणून व जन माणसात सहज मिळून मिसळून चालणारा व सहभाग घेणारा उमेदवार म्हणून अनिल वाघ परिचित आहेत.
आम आदमी पक्ष जळगाव जिल्ह्यात व जळगाव शहराची निवडणूक लढविणार नसल्याचे समजताच पदाधिकाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. अनिल वाघ यांनी कार्यकर्त्यांशी व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आपण मतदारांच्या आग्रहास्तव अपक्ष उमेदवारी करण्याचे ठरविल्याने शेवटच्या दिवशी आप पक्षा ऐवजी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला.
अनिल वाघ यांनी कार्यकर्त्यांना, मतदारांना व व मित्रांना माझी उमेदवारी अपक्ष म्हणून दाखल केले असल्याचे कळविले आहे
जळगाव शहरातून उमेदवारी दाखल केल्यानंतर मतदारांना नम्रता पूर्वक आवाहन करितात की मतदारांनी जळगाव शहराच्या विकासासाठी मला विजयी करा. परिवर्तन केल्याशिवाय सर्वसामान्यांचा विकास होणार नाही. मतदार संघाचा विकास होणार नाही व शहराचा विकास होणार नाही बदलता व्यक्ती, बदलता पक्ष व बदलते सरकार असल्याने तुम्हा सर्वांचा सामान्यांचा विकास होईलच असे अनिल वाघ मतदारांना विनंती करतात.