<
अनिलभाऊ चौधरी यांची युवकांमध्ये क्रेज
रावेर-(प्रतिनिधी) – रावेर विधानसभा मतदार संघात अपक्ष उमेदवार अनिलभाऊ चौधरी यांनी प्रांताधिकारी डॉक्टर अजित थोरबोले यांना नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे. यावेळी मतदारसंघातील माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, सरपंच व सदस्यांसह पदाधिकारी उपस्थित होते.
रावेर मतदारसंघात अनिल भाऊ चौधरी यांची युवकांमध्ये मोठी क्रेझ निर्माण झाली आहे. त्यामुळे आजी-माजी आमदारांना फटका बसण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात बळावली आहे.
शहरातील छोरिया मार्केट येथे सकाळी परिसरातील मान्यवर व तरुणांच्या प्रचंड गर्दीसह जनसमुदाय विजय संकल्प मिळण्यासाठी उपस्थित होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात बाबासाहेबांच्या पुतळ्याचे माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आल्यावर मिरवणूक मार्गस्थ झाली. यावेळी फैजपूर येथील शेख रुबान, रावेर येथील पंकज वाघ, गणेश बोरसे, विकास पाटील, माजी नगराध्यक्ष शीतल पाटील, नगरसेवक शेख सादिक, डॉ. सत्तार, अॅड. सुरेश चौधरी, सुधीर पाटील, दिलीप शिंदे, अब्दुल मुतल्लीब, सिताराम पाटील, पंकज वाघ, फैजपूर येथील शेख कुर्बान, नासिर शेख, अन्वर खाटिक, लखन मंद वडे , यावल नगरसेवक अभिमन्यू चौधरी, राजू वाणी, तुकाराम भारी, अमोल देशमुख, मनोज करणकाळ, राजु शेख, शेरखान, करिम मन्यार, अन्सार शेख, भुसावळ माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, अख्तर पिंजारी, दुर्गेश ठाकूर, सतीश घुले, कृषी उत्पन्न बाजार सभापती सचिन चौधरी, धिरज चौधरी, ललिता ताई अनिल चौधरी, चेतन चौधरी, नितीन धांडे, रमेश येवले आदींसह प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.