ग्राम विकास विद्यालयाच्या मुख्याध्यापकांना माहिती अधिकार कायद्याचे धडे गिरवण्याची गरज

पाचोरा-(प्रतिनिधी)- तालुक्यातील पिंपळगाव (हरे.) येथिल ग्राम विकास विदयालय व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकांना माहिती अधिकाराचे धडे गिरवण्याची गरज निर्माण झाली असून त्यांनी ते धडे गिरवणे आवश्यक आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया मध्ये एक रेकॉर्डिंग व्हायरल झाली होती, या रेकॉर्डिंग मध्ये ग्राम विकास विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळगाव ( हरे.) तालुका पाचोरा जिल्हा जळगाव येथील मुख्याध्यापक व उपसंचालक नासिक शिक्षण विभाग यांचा संवाद होता. या रेकॉर्डिंग मध्ये बऱ्याच गोष्टी ह्या महाविद्यालयाबाबत आक्षेपार्ह होत्या.
त्या अनुषंगाने सत्य शोधण्याच्या उत्सुकतेने जळगाव येथील माहिती अधिकार प्रशिक्षक दिपक सपकाळे यांनी माहितीचा अधिकार अधिनियम -२००५ या कायद्यान्वये दिनांक-३१/०८/२०१९ रोजी रजिस्टर पोस्टाने अर्ज सादर केला होता, त्यावर मुख्याध्यापक यांनी माहितीचा अधिकार अधिनियम -२००५ या कायद्याचा अवमान होईल असे अनपेक्षित उत्तर अर्जदारास पाठवलेले आहे.

अर्जदार यांनी सदर विद्यालयाला माहिती मागितली होती कि, अनुदानित व विनानुदानित ११ व १२ वि च्या विद्यार्थ्यांकडून किती फी घेण्यात अली आहे. व सदर फी बाबत आपण शिक्षण विभागाकडून परवानगी घेतली आहे का? इत्यादी , यावर संबंधितांनी माहिती देणे माहितीचा अधिकार अधिनियम-२००५ या कायद्यान्वये, बंधनकारक होते , परंतु माहिती न देता दुसरीच क्लुप्ती त्यांनी शोधून काढली आहे.

मुख्याध्यापकांनी अर्जदारास पाठवलेले पत्र

मुख्याध्यापकांनी अर्जदारास पत्र पाठवले आहे कि, आपण मागितलेली माहिती १ महिन्यापूर्वी श्री.प्रदीप सुपडू सपकाळ(माहिती अधिकार कार्यकर्ता) रा. वराडसीम ता.भुसावळ जि.जळगाव यांना दिली आहे. सदर माहिती त्यांच्याकडून घेणेस नम्र विनंती. पत्र बघून अक्षरशः मुख्याध्यापकांच्या ज्ञानाची किव आली व तात्काळ पत्रातील विद्यालयाच्या क्रमांकावर संपर्क केला व मुख्याध्यापक यांच्याशी या बाबत विचारणा केली असता त्यांनी हेच सांगितले कि आपण पत्रात नमूद केलेल्या व्यक्ती कडून माहिती घ्या. त्यावर त्यांना विचारणा केली कि, माहितीचा अधिकार अधिनियम- २००५ या कायद्याच्या कोणत्या कलमानुसार आपण असे पत्र अर्जदारास पाठवले आहे? असे विचारताच त्यांनी बोलणे टाळले व नंतर बोलू असे सांगून टाळाटाळ केली. वरील सर्व प्रकार लक्षात घेता यावरून स्पष्ट होते कि मुख्याध्यापक यांना माहितीचा अधिकार अधिनियम -२००५ या कायद्याचे अजिबातच ज्ञान नाही त्यामुळे त्यांनी महिला अधिकार या कायद्यांचे धडे गिरवावे.

ग्राम विकास विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळगाव(हरे.) ता. पाचोरा या विद्यालयात नक्कीच फी चा मोठा भ्रष्टाचार झालेला असल्याचे लक्षात येत आहे. माहिती अधिकारातील माहिती मिळाल्यास भ्रस्टाचाराचे पितड पडण्याची शक्यता आहे.