Thursday, October 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

माहितीचा अधिकार नियम-२०२६ स्थगित

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/07/2026
in माहितीचा अधिकार २००५, राज्य
Reading Time: 1 min read
माहितीचा अधिकार नियम-२०२६ स्थगित

महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, २०२६ स्थगित;राज्य माहिती आयोगाचे सर्व आयुक्तांना निर्देश

मुंबई-(प्रतिनिधी) – राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या ‘महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम-२०२६’ याची अंमलबजावणी पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आली आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाच्या मुख्यालयाने राज्यातील सर्व विभागीय माहिती आयुक्तांना अधिकृत पत्राद्वारे निर्देश दिले आहेत.

राज्य माहिती आयोगाचे सचिव रवीराज फल्ले यांनी जारी केलेल्या पत्रानुसार, माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ च्या कलम २७(२) अंतर्गत राज्य शासनाने १२ जून २०२६ रोजी राजपत्रात प्रसिद्ध केलेले महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, २०२६ हे मा. मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार स्थगित करण्यात आले आहेत.

राज्य माहिती आयोगाने सर्व विभागीय माहिती आयुक्तांना या निर्णयाची माहिती त्यांच्या महसूल विभागातील सर्व शासकीय कार्यालये तसेच सार्वजनिक प्राधिकरणांना तातडीने कळविण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून संबंधित कार्यालयांकडून स्थगिती आदेशाची प्रभावी अंमलबजावणी होईल.

या संदर्भातील पत्र राज्य माहिती आयोगाच्या मुख्यालयातून २९ जुलै २०२६ रोजी जारी करण्यात आले असून, त्याची प्रत मुख्यमंत्री कार्यालय तसेच सामान्य प्रशासन विभागालाही पाठविण्यात आली आहे.

माहितीचा अधिकार क्षेत्रातील कार्यकर्ते, अर्जदार आणि सार्वजनिक प्राधिकरणांसाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात असून, पुढील आदेश येईपर्यंत महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, २०२६ लागू राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भूकरमापक १५ हजारांची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

Next Post

भविष्यातील आव्हानांना सामोरे जावून भारत वैश्विक मेडिकल हब बनणार;संजय येनपुरे

Next Post
भविष्यातील आव्हानांना सामोरे जावून भारत वैश्विक मेडिकल हब बनणार;संजय येनपुरे

भविष्यातील आव्हानांना सामोरे जावून भारत वैश्विक मेडिकल हब बनणार;संजय येनपुरे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली;गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo