Sunday, July 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांचा जळगाव जिल्ह्याचा दौरा; विकासकामे, वनविभाग, महसूल व निवडणूक तयारीची पाहणी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/07/2026
in जळगाव
Reading Time: 1 min read
विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांचा जळगाव जिल्ह्याचा दौरा; विकासकामे, वनविभाग, महसूल व निवडणूक तयारीची पाहणी

जळगाव-(प्रतिनिधी )- नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांनी २ व ३ जुलै २०२६ रोजी जळगाव जिल्ह्याचा दोन दिवसीय दौरा करून विविध विकासकामे, महसूल प्रशासन, आदिवासी विकास, आरोग्य, शिक्षण, वनविभाग तसेच विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) मोहिमेच्या कामांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देत कामांची पाहणी केली, नागरिकांशी संवाद साधला आणि संबंधित विभागांना आवश्यक सूचना दिल्या.

दौऱ्याच्या पहिल्या दिवशी मेहरूण येथे सुरू असलेल्या विभागीय क्रीडा संकुलाच्या बांधकामाची पाहणी करून कामाचा दर्जा, प्रगती आणि आवश्यक पायाभूत सुविधांचा आढावा घेतला. प्रकल्प वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

रावेर तालुक्यातील सावखेडा बु. येथे प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत सुरू असलेल्या घरकुलांची पाहणी करत लाभार्थ्यांशी संवाद साधला. नागरिकांनी मांडलेल्या मागण्यांवर तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

लालमाती येथील शासकीय आश्रमशाळेला भेट देऊन शैक्षणिक सुविधा, डिजिटल वर्गखोल्या आणि विद्यार्थी वसतिगृहाची पाहणी करण्यात आली. आधुनिक तंत्रज्ञानाचा शिक्षण प्रक्रियेत प्रभावी वापर होत असल्याबद्दल विभागीय आयुक्तांनी समाधान व्यक्त केले.

पाल ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधण्यात आला. रुग्णालयातील रिक्त वैद्यकीय पदे भरणे आणि आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याबाबत आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

दुसऱ्या दिवशी पाल व गारबर्डी परिसरातील वनविभागाच्या विविध उपक्रमांची तसेच जंगल सफारीची पाहणी करण्यात आली. याशिवाय रोझोदा ग्रामपंचायत, महसूल कार्यालय आणि नागरिक सेवा केंद्रातील कामकाजाचा आढावा घेण्यात आला. वनहक्क प्रमाणपत्रांचे वितरण तसेच संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना मंजुरीपत्रांचे वाटपही विभागीय आयुक्तांच्या हस्ते करण्यात आले.

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत सुरू असलेल्या मतदार पडताळणी, फॉर्म वितरण, संकलन आणि डिजिटल प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी करून निवडणूक यंत्रणेला आवश्यक सूचना देण्यात आल्या.

यावल पंचायत समिती, फैजपूर उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद शाळेलाही त्यांनी भेट दिली. कार्यालयीन कामकाजात ई-ऑफिस, BPMS आणि ई-कोर्ट प्रणालीचा प्रभावी वापर करण्यावर त्यांनी भर दिला.

दौऱ्याच्या समारोपाप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध शिष्टमंडळांच्या भेटी घेऊन त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या. नागरिकाभिमुख प्रशासन, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, गुणवत्तापूर्ण सेवा वितरण आणि विभागीय समन्वय अधिक सक्षम करण्यावर भर देत विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांनी संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

रस्ते अपघात रोखण्यासाठी विशेष कार्यशाळा संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांचा जळगाव जिल्ह्याचा दौरा; विकासकामे, वनविभाग, महसूल व निवडणूक तयारीची पाहणी

विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांचा जळगाव जिल्ह्याचा दौरा; विकासकामे, वनविभाग, महसूल व निवडणूक तयारीची पाहणी

रस्ते अपघात रोखण्यासाठी विशेष कार्यशाळा संपन्न

रस्ते अपघात रोखण्यासाठी विशेष कार्यशाळा संपन्न

सरकारविरोधात घोषणा देणे गुन्हा नाही; पोलीस सरकारचे नोकर नाहीत – मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

सरकारविरोधात घोषणा देणे गुन्हा नाही; पोलीस सरकारचे नोकर नाहीत – मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

डॉ. जे. जी. पंडित माध्यमिक विद्यालयाचा शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश; १० विद्यार्थ्यांची मेरिटमध्ये चमक

डॉ. जे. जी. पंडित माध्यमिक विद्यालयाचा शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश; १० विद्यार्थ्यांची मेरिटमध्ये चमक

भविष्यातील आव्हानांना सामोरे जावून भारत वैश्विक मेडिकल हब बनणार;संजय येनपुरे

भविष्यातील आव्हानांना सामोरे जावून भारत वैश्विक मेडिकल हब बनणार;संजय येनपुरे

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo