<
भडगांव प्रतिनिधी – (हेमंत विसपुते)-भडगांव पासुन जवळच आठ किमी.अंतरावर असलेल्या नगरदेवळा सुतगिरणीला आज बंद होऊन वीस ते बावीस वर्षे लोटली गेली. मध्यंतरी सुतगीरणीच्या भंगारचा लिलाव करून कामगारांचे बाकी रक्कम देण्यात आली मात्र आज न.सुतगिरणी येथिल वस्तीमध्ये काही घरांवर आजही कामगारांचा ताबा आहे. त्याच घरावरील पत्रे चोरीला जात असून रात्री, अपरात्री येऊन घरावरील छताची पत्रे ही भुरटे चोर चोरून घेऊन जात आहे. अगोदरच कामगारांना त्यांचा मेहनतीचा मोबदला कमी मिळाला असून त्यात ज्या आशेवर कामगार आहेत तेही घरांची पत्रे चोरून जात आहेत. प्रशासनाने यावर लक्ष देणे गरजेचे असून सुतगिरणीवर चोरीचे प्रमाण वाढले असल्याने पोलिस यंत्रणेचे पेट्रोलिंग साठी एक फेरी मारावी असे नागरीकांची मागणी होत आहे.