लोहारा ता.पाचोरा जि.जळगाव (रिपोर्टर ईश्वर खरे)

क्रांतीसुर्य महात्मा फुले यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे वरिष्ठ शिक्षक श्री एन डी सुशीर सर होते कार्यक्रमाचे अध्यक्ष व विद्यालयाचे मुख्याध्यापक नानासो पी. एम. सुर्वे उपमुख्याध्यापक आर. जी.बैरागी सर पर्यवेक्षक व्ही. व्ही. पाटील सर यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे उपशिक्षक ए.डी. गायकवाड सर यांनी केले त्यांनी महात्मा फुलेंच्या सामाजिक कार्याविषयी माहिती दिली यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या शैक्षणिक सामाजिक कार्याविषयी आपले बहुमोल असे विचार मांडले त्यानंतर शिक्षकांमधून पी. यु. खरे सर यांनी गीत सादर करून महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव केला कार्यक्रमाचे अध्यक्ष एन.डी.सुशीर सर यांनी आपल्या भाषणातून महात्मा फुले यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी केलेले प्रयत्न तसेच केलेल्या विविध प्रकारच्या सामाजिक सुधारणा व त्यांची साहित्य निर्मिती याविषयी सखोल अशी माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. एन .पाटील सर यांनी केले व आभार वाय. पी. वानखेडे सर यांनी मानले यावेळी विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









