Sunday, November 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

बहिणाबाई चौधरी यांच्या ७५व्या पुण्यतिथीनिमित्त ३ डिसेंबर ला ‘स्मरण बहिणाईचे’ कार्यक्रम

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/11/2026
in जळगाव, सामाजिक
Reading Time: 1 min read

जळगाव- (प्रतिनिधी) : जुने जळगाव येथील चौधरीवाड्यातील बहिणाई स्मृती संग्रहालयात गुरुवार, दि. ३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या ७५व्या पुण्यतिथीनिमित्त ‘स्मरण बहिणाईचे’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. बहिणाईंच्या स्मृतींना अभिवादन करण्यासह त्यांच्या साहित्यिक योगदानाचे स्मरण करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध कवी प्रभाकर महाजन (बहिणाईंंचे ग्रामजीवन व त्यांची गाणी) आणि साहित्यिक अरविंद नारखेडे (लेवागणबोलीचा गोडवा) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. प्रसिद्ध चित्रकार तथा साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक राजू बाविस्कर (चित्रकार ते साहित्यकार प्रवास) कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. यावेळी ठरलेल्या विषयानुसार वक्ते संवाद साधतील. या साहित्यिक कार्यक्रमास साहित्यप्रेमी आणि रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने समन्वयक अशोक चौधरी यांनी केले आहे.

बहिणाईंच्या कवितांमधून कान्हदेशची माती, तेथील लोकजीवन, संस्कृती आणि लेवागणबोलीचा गोडवा अनुभवायला मिळतो. त्यांच्या साहित्याचा हा अमूल्य ठेवा केवळ एका प्रदेशाची सांस्कृतिक ओळख नसून संपूर्ण मराठी साहित्याची समृद्ध परंपरा आहे. त्यांच्या साहित्यिक योगदानाचे स्मरण करण्याबरोबरच हा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न ‘स्मरण बहिणाईचे’ या कार्यक्रमातून केला जाणार आहे.

या कार्यक्रमाला बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टच्या विश्वस्त सौ. ज्योती अशोक जैन, बहिणाबाईंच्या नातसून पद्माबाई व पणतसून स्मिता चौधरी, ट्रस्टचे विश्वस्त, चौधरीवाड्यातील बंधू-भगिनी, साहित्यिक, नूतन मराठा महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच अनुभूती-२ मधील विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित असतील. अशा या थोर कवयित्रीच्या ७५व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यासाठी, त्यांच्या साहित्याचा आस्वाद घेण्यासाठी, खान्देशच्या साहित्यिक-सांस्कृतिक परंपरेचा गौरव करण्यासाठी साहित्यप्रेमी, रसिक आणि नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन, बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

डॉ.जे.जी.पंडित विद्यालयात महात्मा फुले यांची पुण्यतिथी साजरी

Next Post

सुभाष यादव सरोदे सर यांना पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक गौरव पुरस्काराने सन्मानित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

सुभाष यादव सरोदे सर यांना पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक गौरव पुरस्काराने सन्मानित

सुभाष यादव सरोदे सर यांना पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक गौरव पुरस्काराने सन्मानित

बहिणाबाई चौधरी यांच्या ७५व्या पुण्यतिथीनिमित्त ३ डिसेंबर ला ‘स्मरण बहिणाईचे’ कार्यक्रम

डॉ.जे.जी.पंडित विद्यालयात महात्मा फुले यांची पुण्यतिथी साजरी

डॉ.जे.जी.पंडित विद्यालयात महात्मा फुले यांची पुण्यतिथी साजरी

जळगाव येथे उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालक कार्यालयीन इमारतीचे उद्घाटन; प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र सहसंचालक कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव– उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

जळगाव येथे उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालक कार्यालयीन इमारतीचे उद्घाटन; प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र सहसंचालक कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव– उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

सुरेल स्वरांच्या बरसातीत रंगली रौप्यमहोत्सवी पाडवा पहाट

सुरेल स्वरांच्या बरसातीत रंगली रौप्यमहोत्सवी पाडवा पहाट

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

सत्यमेव जयतेचे अपडेट्स व्हाटसअ‍ॅपवर मिळवा.