<
पाळधी/जळगांव(प्रतिनीधी)- धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील असलम रसुल मन्यार यांची राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे धरणगाव तालुका प्रसिद्धी प्रमुख पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. अपंगांना ते शासकीय योजना विषयी ते नेहमी मार्गदर्शन करतात. त्यांनी अपंगांना निधीचा लाभ नुकतेच मिळवून दिला. त्यांचा या कार्याची दखल घेत राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे तालुका अध्यक्ष संजय पाटील यांच्या मान्यतेने त्यांची राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे तालुका प्रसिद्धी प्रमुख पदी निवड करण्यात आली. तसे पत्र त्यांना प्राप्त झाले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, उपजिल्हा प्रमुख पीएम पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, पंचायत समिती सदस्य मुकुंद नन्नवरे, पाळधी बु चे सरपंच प्रकाश पाटील,भ्रष्टाचार निवारण समितीचे जिल्हा अध्यक्ष दिपक सावळे, तसेच पाळधीकरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.