<
चाळीसगाव : तालुक्याला संपूर्ण महाराष्ट्रात एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहत शहरातील व ग्रामीण भागातील स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असेल तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नामदार गिरिषभाऊ महाजन व खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली गिरणा व मन्याड च्या परिसरात सिंचन सुबत्ता आणणार असे प्रतिपादन भारतीय जनता पक्ष व महायुतीचे चाळीसगाव मतदारसंघातील उमेदवार मंगेश रमेश चव्हाण यांनी उंबरखेड-सायगाव गटाच्या सायगाव याठिकाणी झालेल्या विजय संकल्प मेळाव्यात केले.
त्यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष डॉक्टर संजीव पाटील, तालुकाध्यक्ष के.बी. साळुंखे, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, ज्येष्ठ नेते राजेंद्र चौधरी, उपसरपंच पैलवान नथु पैलवान, शिवसेना नेते धर्माबापू काळे, पंचायत समिती सभापती दिनेशभाऊ बोरसे, मार्केट संचालक रवी आबा पाटील, गटनेते संजय रतनसिंग पाटील, माजी तालुकाध्यक्ष सुरेश सोनवणे, किशोर पाटील, बाळासाहेब मगर, रिपाई नेते व नगरसेवक आनंद खरात, चंद्रकांत तायडे, सोमसिंग राजपूत, बापू आहिरे, संजय पाटील, चीरागुद्दिन शेख, भास्कर पाटील, तालुका उपाध्यक्ष कपिल पाटील, तालुका अध्यक्ष रोहन सूर्यवंशी, अमोल चव्हाण, अध्यक्ष रोहन सूर्यवंशी, अमोल चव्हाण, बूथशक्ती केंद्र प्रमुख दिनेश माळी, मनोज साबळे, रवींद्र पाटील, मनोज गोसावी, व सर्व भारतीय जनता पार्टी, शिवसेना महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते, आजी माजी पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे मंगेश चव्हाण म्हणाले की, तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी जलयुक्त शिवार, आरोग्यासाठी सुसज्ज प्रथमोपचार केंद्र विद्यार्थ्यांसाठी भव्य अभ्यासिका शिष्यवृत्ती योजना, दळणवळणासाठी रस्ते, सांडपाण्यासाठी गटारी व विकसनशील तालुका घडवून समाजातील तळागळातील व्यक्ती पर्यंत सर्व शासकीय योजना पारदर्शकपणे पोहोचविण्याचे काम करेल. यासाठी आपणा सर्वांची साथ व मायबाप जनतेचा आशिर्वाद माझ्या पाठीशी सदैव असू द्या असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
यांनी वेक्त केली मनोगत…….
जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील, तालुकाध्यक्ष के. बी. साळुंखे, आनंद खरात, चंद्रकांत तायडे, रवींद्र पाटील, नथ्थु चौधरी, संभाजी पाटील आदींनी आपल्या मनोगतात पक्षाला अधिकाधिक मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार केला.