<
‘मतदार संघांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जनतेने निवडून देण्याचा दिला विश्वास;समृद्ध मतदार संघाचे स्वप्न
फैजपूर-(शाकिर मलिक)- सतत ग्रामीण भागातील जनतेशी असलेला संपर्क, यामुळे त्यांच्याशी व येथील मातीशी नाळ जुळलेली आहे. रावेर-यावल तालुक्यातील लोकांनी पाहिलेले समृद्ध मतदार संघाचे स्वप्न पूर्ण निवडून देईल. असा विश्वास मतदारांनी शिरीष मधुरकरराव चौधरी यांना आज जनतेने दिला. आज दि ७ रोजी हंबर्डी, हिंगोणा, बोरखेडा खु!, सांगवी बु!, चितोडा, राजोरा, अट्रावल, सांगवी खु! या आठ गावांमध्ये प्रचार दौरा केला. यावेळी ग्रामस्थांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.
यावेळी प्रचारात माजी आमदार रमेशदादा चौधरी, जिल्हा परिषद गटनेते प्रभाकर अप्पा सोनवणे, तापी परिसर विद्या मंडळाचे चेअरमन लिलाधर चौधरी, जिल्हा परिषद सदस्या सौ. सुरेखा नरेंद्र पाटील, यावल पंचायत समिती गटनेता शेखर पाटील, पंचायत समिती सदस्य सरफराज तडवी, तडवी समाजसेवक रमजान तडवी, लोहारा माजी सरपंच संजू जमादार, मारुळचे माजी सरपंच अकिल्उद्दीन फारुकी, विलास कराड कोचुर, योगेश भंगाळे, बापू पाटील, किशोर बोरोले, स्वप्निल पाटील, न्हावीचे जब्बार भाई, माजी ग्रामपंचायत सदस्य अरुण तायडे मेंबर, कैलास पाटील, जितेंद्र चौधरी, यांचासह काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-पी.आर. पी. ( कवाडे गट)-स्वाभिमानी शेतकरी संघटना याआघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते प्रचारात सहभागी झाले होते, दरम्यान हंबर्डी येथे रेणुका माता मंदिर येथे दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात झाली. प्रचारात प्रमोद पाटील, किसन गोविंदा पाटील, माजी सरपंच बलदार तडवी,लिलाधर नामदेव किरंगे, लक्ष्मण हिरामण पाटील, विमल अरुण पाटील, वासुदेव दामू पाटील, अजय तुकाराम पाटील, खिलचंद नेहेते सोबत होते.
हिंगोणा गावी स्वामींनारायन मंदिर हनुमान मंदिर, विठ्ठल मंदिर या देवस्थानात शिरिषदादा चौधरी यांनी दर्शन घेतले, याठिकाणी प्रचारात किशोर फालक, महेश राणे, भूषण भोळे राजेंद्र राणे, छगन गाजरे, निळकंठ जंगले, बाळू फालक, प्रशांत मोरे,गोपाळ गाजरे, दीपक बढे, चेतन बढे, पांडुरंग बढे, गोविंदा इंगळे, प्रकाश पाटील, भूपेंद्र झोपे, अण्णा महाजन, नवलसिंग लोंढे, संजय लोंढे, हारून खान, शब्बीर तडवी दगळू तडवी यांच्यासह ग्रामस्थ यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
बोरखेडा खुर्द येथे हनुमान मंदिर दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात झाली, यावेळी मजीत कालु तडवी, लतीब लालखा तडवी, सिकंदर भिकन तडवी, जुर्मा अयुब तडवी, जोहर अल्लाबक्ष तडवी, रसूल अल्लाबक्ष तडवी, कालु दिलदार तडवी, इकबाल तडवी, निजाम करीम तडवी, दस्तगिर फक्तु तडवी यांच्या सह आबालवृद्ध सहभागी झाले होते.
सांगवी बु ! येथे सय्यद शाह शरीफ बाबा दर्गास्थळी चादर चढवून व बौध्द विहार येथे दर्शन घेऊन प्रचाराला सुरवात केली. यावेळी जे टी महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे उपाध्यक्ष उल्हास निंबा चौधरी, शामराव मेघे, डॉ नरेंद्र पाटील, गिरीश धांडे, अशोक सेवकराम चौधरी, सुपडु बोंदर तायडे, पिरन महेबूब तडवी, चंदू मेघे, माजी सरपंच हमीद तडवी, गोंडू मेंबर यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले होते.
चितोडा येथे विठ्ठल मंदिर दर्शन व सप्तशृंगी माता मंदिर याठिकाणी दर्शन घेऊन प्रचारार्थ सुरुवात केली. प्रचारात सहभागी भरत पुरुषोत्तम पाटील, उपसरपंच चंद्रकांत जंगले, प्रवीण वासुदेव भंगाळे, विकास सोनू बोंडे, योगेश निळकंठ कुरकुर, पाटील, मोहित धांडे, प्रशांत सुदाम पाटील, सोनू भागवत पाटील, मुरलीधर मोहन पाटील, भागवत कमलाकर खिलचंद पाटील, महेंद्र मुरलीधर किसन पाटील, सुदाम जनार्दन पाटील, लोकेश लीलाधर भंगाळे व ग्रामस्थ सहभागी झाले होते. राजोरा येथे सीताराम पाटील, गिरीधर पाटील, विनायक पाटील, यशवंत पाटील, प्रभाकर महाजन यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सांगवी खु ! येथे दत्तू पाटील , सरपंच विकास पाटील, आनंदा धनगर, मुकुंदा कोळी, डी के पाटील गणेश भादु कोळी यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले होते, अट्रावल प्रचारात मसाका संचालक नितीन व्यंकट चौधरी, सरपंच संगीता चौधरी,उपसरपंच गोकुळ चौधरी, हेमंत एकनाथ चौधरी संदेश पाटील, पिंटू तायडे, सोपान मधुकर चौधरी, भानुदास शंकर चौधरी, सुनील निवृत्ती, भानुदास बहाटे, भानुदास शंकर चौधरी यांच्यासह असंख्य गावकरीही आवर्जून प्रचारात सहभागी झाले होते.
ग्रामस्थ “वृद्धांच्या आशीर्वादासह रेकॉर्डब्रेक औक्षण”
शिरिषदादा चौधरी यांच्या प्रचाराचा झंझावात… आज काढण्यात आलेल्या प्राचार दौऱ्यात आठही गावात ग्रामस्थांनी भरभरून प्रतिसाद देत प्रत्येक गावात ठिकठिकाणी औक्षण करून स्वागत केले. याबरोबरच शिरिषदादा यांना वृद्धांकडून भरभरून आशीर्वाद मिळाले व निवडून देण्याचे मतदारांनी आश्वासन दिले.