<
जळगाव (स्वप्निल सोनवणे): – जळगाव ग्रामिण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना -भाजपा महायुतीचे उमेदवार तथा सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यात प्रचारात आघाडी घेतली असून तरुण व जेष्ठ मतदार स्वच्छेने रॅलीमध्ये सहभाग घेत आहेत. गावा गावांमध्ये हजातोंच्या संख्येने मतदार सामील होऊन शिव धनुष्य हाती घेऊन गुलाबराव पाटील यांना भक्कम साथ देत आहे. वाढत्या गर्दीमुळे रॅलीचे रूपांतर मेळाव्यात करावे लागले.
तालुक्यातून भोकर – कानळदा या जि.प. गटातून सर्वाधिक लीड देण्यासाठी आम्ही रात्रंदिवस मेहनत घेऊन मतदारांपर्यंत संपर्क करण्यासाठी उपस्थितांनी मेळाव्यात निर्धार केला. मंजुरीच्या अंतिम टप्यात असलेले भोकर पुलाचे काम व बलून बंधाऱ्याचे काम करण्यास कटिबद्ध असल्याचे गुलाबराव पाटील यांनी मेळाव्यात सांगितले. सांगितले.
रा. कॉ. कार्यकर्त्यांचा सेनेत प्रवेश
मेळाव्या प्रसंगी येथील पिळखेड्याचे सरपंच निबासाळुंके, ग्रा प सदस्य योगिराज भालेराव, अनिल चौधरी यांच्या सह अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचे स्वागत राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रचार रॅलीत शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे , राजेंद्र चव्हाण, सभापती कैलास चौधरी, संचालक अनिल भोळे, मुकेश सोनवणे ,संजय घुगे, प्रमोद सोनवणे, बालाशेठ, भाजपाचे प्रभाकर पवार, पं. स.सदस्य हर्षल चौधरी,जनाअप्पा कोळी, गोपाल जिभाऊ पाटील, रामचंद्रबापू पाटील सचिन पवार, सरपंच शामकांत जाधव, गुलाब कांबळे, किशोर आगीवाल, दिलीप आगीवाल, चुडामान वाघ, किशोर वाघ, मंगलसिंग पाटील, दिलीप सोनावणे, रविंद्र चौधरी, दगडू सुरवाडे, विजय पाटील, भगवान पाटील, विलास चौधरी, सय्यद राजाक, किरण भोई, विजय कोळी, विलास सोनावणे, नगरसेवक मनोज चौधरी, यांच्यासह कानालाद भोकर जि.प.गटातील सर्व सरपंच, ग्रा. प. पदाधिकारी शिवसेना – भाजपा रिपाई महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते ग्रामस्थ प्रचंड संख्येने उपस्थित होते.