<
भडगांव येथे प्रदेशाध्यक्ष मा.जयंत पाटील, प्रदेश सरचिटणीस मा.अमोल मिटकरी यांचा उपस्थितीत सभा संपन्न
पाचोरा(प्रमोद सोनवणे)- मा.आ.दिलीप भाऊ वाघ यांच्या प्रचारार्थ आज १०रोजी भडगांव येथे आझाद चौक येथे जाहीर सभा झाली,या वेळी जेष्ट नेते दत्ता आबा पवार, राष्ट्रवादी चे जिल्हा अध्यक्ष रविंद्र भैय्या साहेब ची भाषणे झाली. पुढे सभेत बोलताना, राष्ट्रवादी चे प्रदेश सरचिटणिस, अमोलजी मिटकरी आपल्या शैलित म्हणाले उध्दव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात कोणताही विचार मांडला नाही,तसेच अमित शहा यांच्या कालखंडात त्याची सरकार असताना एकही पोलीस भरती झाली नाही, सेना व सरकार वर कडाडून टीका केली, राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार दिलीप भाऊ वाघ आपल्या भाषणात भडगांंव शहराचा व ग्रामिण भागाचा विकास झाला नाही व पाच वर्ष सतत यांनी या मतदार संघाकडे दुर्लक्ष केले.काम झाली असे पाट्यांनवर लावुन ते सांगता आहेत मी हा विकास केला तो विकास केला परंतु प्रत्यक्षात कुठलेही कामे झालेली नाहीत,शहरी भागामध्ये देखील तीच परिस्थिती आहे पाचोरा भडगांव नगरपालिका सध्या त्यांच्या नेतृत्वात काम करत आहे तुम्ही आम्ही भडगाव शहराच्या लोकांनी पाहिले असेल, आवश्यकता नसलेल्या त्या ठिकाणी संरक्षण भिंत बांधली व करोडो रूपयांचा मलिदा या मध्ये मारला, आता पुल बांधण्याचे काम घेतले आहे.
काँन्ट्रक्टर त्यांचाच मित्र आहे ते स्वतः भागिदार होतात,भागिदारी मध्ये यांनी सगळी कामे केली आहेत. आठशे कोटीचा विकास ते सांगतात प्रत्यक्षात जि.प. पं.स. ग्रा.पं. ह्या कामाचे श्रेय देखिल ते घेतात. मागच्या कालखंडा मध्ये त्यांनी एम.आय.डी.सी मंजुर करून आणली असे सांगतात.निभोरा गावाजवळ त्यांच्या नातेवाईकाच्या नावावर जागा त्यांनी घेतल्यात व सरकारी एँक्रेटेशन मध्ये त्या जागा लावल्यात आणि यातून त्यांना करोडो रूपयांचा फायदा यांना मिळणार आहे. तालुक्यात कोणत्याही लोकांना, तरूणानां रोजगार मिळणार नाही ते काम फक्त स्वताच्या फायद्या साठी केले आहे असे राष्ट्रवादी चे उमेदवार दिलीप भाऊ वाघ यांनी म्हटले. सभेचे अध्यक्ष स्थानी राष्ट्रवादी चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील होते.
आपले अध्यक्ष भाषणात आपल्या कणखर शैलित,पिक विम्याचे पैसे भडगांव पाचोर्यात मिळाले नाहीत पिक अनुदान पासुन शेतकरी वंचित ठेवण्यात आले.भडगाव पाचोरा गारपीट मुळे नुकसान झालेल्या शेतकर्याना भरपाई मिळाली नाही आमचे सरकार आल्यास महाराष्ट्रात शेतकर्याने कोणतेही कर्ज काढले असेल तर आमचे सरकार संपुर्ण कर्जमुक्ती करेल. दोन कोटी ते पाच कोटी पर्यंत कर्ज महीला बचत गटांना देऊ,राष्ट्रवादी सरकार असताना दहा कोटी जलसिंचन साठी आमच्या सरकारने दिले होते,असा निर्वाळा त्यानी दिला. या प्रसंगी बहुसख्यं युवकांनी व पुरुषांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला,या वेळी व्यासपिठावर प्रदेशाध्यक्ष मा.जयंतरावजी पाटील, प्रदेश सरचिटणीस मा.अमोल मिटकरी, गफ्फार मलिक अल्पसंख्याक सेल प्रदेशाध्यक्ष, मा.शेख सुभान अली प्रदेश सचिव, मा.रवींद्रभैय्या पाटील जिल्हाध्यक्ष, मा.रवींद्र पाटील युवक जिल्हाध्यक्ष, मा.निलेश पाटील, ग्रंथालय सेल जिल्हाध्यक्ष, मा.विलास पाटील कार्याध्यक्ष,मा.आमदार दिलीप भाऊ वाघ, मा संजय नाना वाघ, मा.खलील देशमुख प्रवक्ते, मा योगेश देसले प्रवक्ते, जेष्ठ नेते दत्ता आबा पवार, मा.नितीन तावडे, मा.संतोष भाऊ जाधव तालुकाध्यक्ष भडगाव,मा विजय पाटील पाचोरा तालुकाध्यक्ष,मा शामदादा पाटील शहराध्यक्ष, मा.भैय्यासाहेब पाटील तालुकाध्यक्ष ग्रंथालय सेल, नगरसेवक डॉ विजयकुमार देशमुख, बशीर बागवान, इसाक मलिक, भिकनूर पठाण, सुचेता ताई वाघ, ज्योतीताई वाघ, सुरेखाताई पाटील, योजना ताई पाटील रेखाताई पाटील, विकास पाटील, सुभाष दगा पाटील, मा.विश्वासराव भोसले उपसभापती मार्केट कमिटी, दिलीप पाटील संचालक मार्केट कमिटी, ललित वाघ गटनेते प स पाचोरा, राजेंद्र परदेशी मा सभापती प स भडगाव, स्वप्नील पाटील, शिवाजी राजाराम पाटील, सनी दादा वाघ,अजहर भाई, बापूराव नारायण पाटील, विश्वासराव सोमवंशी, नवल तात्या भोसले, निमंन दादा, रफिक शेख, रवींद्र महाजन, प्रकाश पाटील, अरुण सोनवणे मागासवर्गीय सेल तालुकाध्यक्ष, डॉ जे डी शेख, डॉ अमृत पाटील, शेरखान भाई, रणजित पाटील, व्ही एस पाटील, डी डी पाटील, इस्माईल बागवान, शेख जलालूद्दीन शेख अजीज, अब्दुल गणी, शेख रहीम, इंदाज अली,अजगर पठाण, कुर्बन कुरेशी, डॉ हेमंत पाटील, रणजित पाटील, दगाजी आण्णा वाघ, जगदीश सोनार, सतीश चौधरी, सुरजदादा वाघ, रशीद पठाण, रणजित पाटील, शशी चंदिले हे उपस्थित होते, सभेला प्रचंड प्रतिसाद मिळालेला दिसत होता शहर भागातुन व ग्रामिण भागातुन मोठ्या संख्येने जनसमुदाय सभेसाठी जमलेला होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्याध्यक्ष हर्षल पाटील यांनी तर आभार डी डी पाटील सर यांनी मानले.