<
फैजपूर(मयूर मेढे) -येथील यावल रोड वरील सुरभी केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त १०० भारतीय वृक्षांची लागवड मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली या सर्व वृक्षांचे संगोपन शिष्यत्व म्हणून स्वीकारण्यात आले आहे. या सुत्य उपक्रमाचा शुभारंभ प पू पूर्णानंदजी महाराज त्यांच्या धर्मपत्नी सौ धनश्री यांचे हस्ते गुरू प्रतिक असलेल्या औदुंबर वृक्षाचे रोपण करून करण्यात आले. याप्रसंगी पूर्णानंदजी महाराज म्हणाले की, प्रत्येक वृक्षारोपण करून त्या वृक्षांला गुरु मानून त्या वृक्षाची शिष्य भावनेतून सेवा संगोपन केले पाहिजे. सामाजिक व वैयक्तिक वृक्षारोपण ही काळाची गरज झाली आहे. सनातन हिंदु धर्माच्या धर्मग्रंथात वर साधुसंतांनी त्या काळातच ही गरज आपल्या लेखणीतून-वाणीतून वृक्षवल्ली आम्हा सोयरी म्हणून जनतेसमोर मांडली आहे. तसेच अनेक वृक्षांना आपले प्रति स्वरूप स्थान दिले आहे. उदाहरणार्थ औदुंबर, श्री गुरुदत्त, पिंपळ -विष्णू , मुंजोबा, वड, ब्रह्मा, बेल महादेव, रुई हनुमान, असे असताना ही आपण या।भावी स्वार्थापोटी दुर्लक्ष केल्याने दैवीसृष्टी असलेले पर्यावरण आज आपल्यावर कोपले आहे. भावी पिढीच्या उत्तम आरोग्यासाठी वृक्षांना गुरुस्थानी मानून यांची सेवा संगोपन हे प्रत्येकाने केलेच पाहीजे सुरभी गोसेवा केंद्रातर्फे परिसरात याउपक्रमातून किमान ५०० भारतीय वृक्ष लागवड केली जाणार आहे. त्यातील १०० वृक्षारोपण आज गुरुपौर्णिमाचे दिनी झाले आहे असे प्रतिपादन यावेळी केले.
याप्रसंगी डॉ गणेश भारंबे, भक्ती महिला मंडळाच्या अध्यक्ष रोहिणी भारंबे, संजय महाजन, साधना महाजन, सुनील बढे, भारती बढे, मनोज नेमाडे, सविता नेमाडे, भाजपा माजी तालुकाध्यक्ष नितीन भाऊ राणे, शहराध्यक्ष संजय रल, सुरेश सिंह परदेशी, नरेंद्र चौधरी, करण सिंह परदेशी, मातोश्री फाऊंडेशन उपाध्यक्ष चंद्रकांत जंगले, एम मुसा जनविकास कामगार संघटना अध्यक्ष मलक शाकीर, डॉ राजेंद्र बडे, हाडवैद्य रघुनाथ कुंभार, खानदेश नारीशक्ती अध्यक्ष दिपाली झोपे, राष्ट्रीय नमो सेना जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, मोरेश्वर किरंगे, सह गोसेवा समिती सदस्य युवराज चौधरी, संजय सराफ, वसंत सिंह परदेशी, डॉ प्रशांत पाटील, प्रशांत चौधरी उपस्थित होते.