<
एरंडोल(प्रतिनीधी)- महाराष्ट्र राज्यात विधानसभा२०१९ निवडणुकीच्या संदर्भात २१तारखेला मतदान होत असून याप्रसंगी प्रत्येक मतदान केंद्रांवर पिण्याच्यापाण्याचे जार, मतदान केंद्राध्यक्ष ते सर्व कर्मचारी यांना आरोग्य संदर्भात काही प्रश्न उपलब्ध झाल्यास प्रथमोपचार म्हणून लागणारी मेडिकल किट आधी सर्व आवश्यक सुविधा असाव्यात असे निवडणूक आयोगाच्या १६मार्च २०१९च्या पत्रान्वये मित केल्यानुसार सर्व सेवा प्रत्येक मतदान केंद्रावर उपलब्ध करून मिळाव्यात या संदर्भात शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वय समिती, तसेच महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाने पुढाकार घेतला असून शिक्षक संघटना राज्य समन्वय समितीचेचे राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्य महासचिव किशोर पाटील कुंझरकर यांनी यासंदर्भात एरंडोल तालुक्यातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कडे संघटनेच्या लेटरहेडवर निवेदन आज दिनांक १२ रोजी दिले. सदरील सुविधांच्या संदर्भात राज्यातील सर्वच मतदान केंद्रांवर ते उपलब्ध व्हाव्यात यासाठी पुढाकार घेतला असून बहुतांश मतदार संघातील मतदान केंद्रांवर शंभर टक्के सुविधा असतात परंतु तुरळक ठिकाणी सुविधा नसतात अशी भावना राज्यातील शिक्षकांची असल्याने त्या भावनेचा आदर करून हे निवेदन देण्यात आल्याचे त्यांनी पुढे म्हटले.महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्य महासचिव तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वयसमितीचे राज्य समन्वयक या भूमिकेतून कुंझरकर यांनी केले ल्या मागणीला महत्त्व असून या छोट्या परंतु आरोग्याच्या दृष्टीनेमहत्त्वपूर्ण भूमिकाबाबत कुंझरकर यांचे येथे शिक्षक वर्गातून स्वागत होत आहे त्यांनी केलेल्या मागणीला महत्त्व असून शिक्षक हितासाठी ते सतत पुढाकार घेत असून राज्य निवडणूक आयोगाकडे देखील या संदर्भात पाठपुरावा करून मेडिकल किट सर्व मतदान केंद्रांवर उपलब्ध करण्याच्या संदर्भात भूमिका असल्याचे म्हटले.