<
जळगांव(प्रतिनीधी)- जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून रवी देशमुख यांची वंचित बहुजन आघाडीच्या पुरस्कृत उमेदवार म्हणून निवड झाल्याने आज जळगाव येथील महिंद्रा हॉटेल येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पत्रकार परिषदेत वंचीत बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांची स्वाक्षरी असलेले पाठिंब्याचे पत्र रवी देशमुख यांना देण्यात आले. पत्रकार परिषदेत बोलताना रवी देशमुख म्हणाले की आज तागायत जळगाव ग्रामीण मतदारसंघाचा हवा तेव्हढा विकास झालेला नाही. समस्यांचे निवारण करण्यासाठी मी निवडणूक लढवीत आहे. जळगाव ग्रामीणचा रखडलेला विकास पूर्ण करण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील, धरणगाव शहरामध्ये गेल्या ३५ वर्षापासून शहरवासियांना दूषित व गढूळ पाणी स्थानिक नेत्यांनी आतापर्यंत पाठवलेले आहेत. तरी वंचित बहुजन आघाडी मार्फत धरणगाव शहरासाठी शुद्ध पाण्याचे नियोजन करण्यासाठी मी कटिबद्ध राहील असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. येणाऱ्या २१ तारखेला वंचित बहुजन आघाडीचा पुरस्कृत उमदेवार म्हणून मला मतदान करून संधी द्या असे आव्हान रवी देशमुख यांनी जनतेला केले आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे, युवक जिल्हाध्यक्ष सुमित सोनवणे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे, युवक तालुकाध्यक्ष जितेंद्र साळवे, महिला जिल्हाध्यक्ष सुजाता ठाकुर यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.