<
कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मिळाला पर्यावरण समतोलाचा संदेश
जळगांव(प्रतिनीधी)- दिवाळी सण आला की बच्चेकंपनीला वेध लागतो तो सुट्या आणि रंगबेरंगी आकाश कंदिलांचा. यामुळे सरस्वती विद्या मंदिरात विद्यार्थ्यांना शाळेतच आकाश कंदील बनविण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली. इयत्ता १ली ते ४थी शिक्षकांनी अभिरुची पूरक उपक्रम राबवून कागदी आकाश कंदिल व दिवे लावून तसेच फटाके मुक्त प्रतिज्ञा घेवून शाळेत पर्यावरण पूरक दिवाळी साजरी केली. यात विद्यार्थ्यांनी स्व निर्मित आकाश कंदिल या कार्यशाळेत बनवले. आजच्या धकाधकीच्या जीवनात नोकरी, कामधंदा सांभाळत घराची साफसफाई, फराळ बनविण्यात लोकांची दमछाक होते. त्यात हस्तकलेतून साकारला जाणारा आकाश कंदील तयार करण्याचा तर लोकांना आता विसरच पडला आहे. यातच या आकाश कंदिलांची जागा चायनीज कंदिलांनी घेतली आहे. मात्र सरस्वती विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांनी पर्यावरण समतोलाचा संदेशही विद्यार्थ्यांनी या माध्यमातून दिला. घरच्या घरी आकाश कंदील बनवून वापरणे दिवसेंदिवस कमी होत असताना सरस्वती विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक आकाश कंदील बनविले. या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन व नियोजन शिक्षक सुवर्णलता अडकमोल व सविता ठाकरे यांनी केले.या वेळी फटाक्यांमुळे पक्षाना व मुक्या जनावरे यांचा शरीरावर होणारे दुष्परिणाम तसेच पर्यवरणाची हानी होते.फटाक्यमध्ये वापरल्या जाणाऱ्या रसायनामुळे अनेक प्रकारचे आजार संभवतात.फटाक्यांमुळे हवा व वातावरण दूषित होते.ध्वनी प्रदूषणाची पातळीही वाढते.धुरामुळे श्वासाचे,फुप्फुसाचे विकार, डोळ्यांची जळजळ,रक्तदाब वाढणे,हृदयविकाराचा झटका बसने,निद्रानाश या सारख्या विकारांना सामोरे जावे लागते त्यामुळे फटाके फोडूनमिळणाऱ्या क्षणिक आनंदासाठी आपण नकडतपने दिर्घकाळाची हानी विकत घेत आहे असे मार्गदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ वसाने यांनी विद्यार्थ्यांनाकेले. यावेळी आपण तयार केलेला कंदील आपल्याच घरी लावणार आहे, याचे समाधान विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. हि कार्यशाळा शाळेतील शिक्षिका सौ.भारंबे, ब्रम्हणकर, ठाकरे, अडकमोल यांनी राबविली तर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ वसाने यांचे सहकार्य लाभले तर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन संस्थेचे अध्यक्ष मनोज पाटील यांनी दिले.