Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

विकासासाठी, भगव्यासाठी, महाराष्ट्रासाठी आप्पानांच निवडुन द्यावे-नितीन बानगुडे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read
विकासासाठी, भगव्यासाठी, महाराष्ट्रासाठी आप्पानांच निवडुन द्यावे-नितीन बानगुडे

अफाट जनसमुदायाच्या साक्षीने व्याख्याते नितीन बानगुडे यांची जाहीर सभा संपन्न -भगवा विजयी झालाच पाहीजे

भडगांव-(प्रमोद सोनवणे) – शिवसेना-भाजप महायुतीचे अधिकृत ऊमेदवार मा.आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रचारार्थ भडगाअंव आझाद चौक येथे नितीन बानगुडे झुंजार व्याख्याते यांची जाहीर सभा नुकतीच पार पडली. शिवाजी महाराज,ज्योतीबा फुले,सावित्री फुले यांच्या प्रतीमेस पुजन करून माल्यार्पण करण्यात आले. या जाहीर सभेचे सुत्रसंचालन मनोहर चौधरी शहरप्रमुख यांनी केले. यावेळी डाॅ.प्रमोद पाटील यांनी विकास करण्यासाठी व वेगवेगळ्या मंजुरी मिळवण्यासाठी मंत्रालयात फेर्या माराव्या लागता त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो आणी ती कामे करण्यासाठी किशोर आप्पा यांनी रात्र दिवस मेहनत घेतली आहे त्याचे आम्ही साक्षीदार आहोत असे ते म्हणाले. या वेळी अफाट जनसमुदाय उपस्थित होता. डाॅ.विशाल पाटील यांनी विकासासाठी किशोर आप्पा अहोरात्र झटतात त्यासाठी त्यांनी विजयश्री साठी लीड जास्त प्रमाणात द्यावा असे आवाहन केले. विकास तात्या यांनी आपल्या भाषणात आमदार किशोर आप्पा यांनी वाडे गुढे जुवार्डी येथिल चार वर्रषापासून खडलेली कामेसुद्धा मार्गी लावली तसेच विकास करणारा एकमेव आमदार आपल्याला लाभला आहे त्यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. अमोल नाना पाटील यांनी देंवेद्र फडवणिस व नरेंद्र मोदि यांच्या कालखंडात सर्वात जास्त विकासाची कामे झाली असून भडगांव पाचोरा मतदार संघात किशोर आप्पा यांनी विजेचा प्रश्न असो जल सिंचनचा प्रश्न असो बांधकाम विभागातील रस्ते असो सर्व प्रश्न मार्गी लावले आहेत. अशा विकास करणार्या आमदार किशोर आप्पाना भरगोस मतांनी विजयी करू असे आश्वासन दिले. डाॅ.संजिव पाटील यांनी जळगांवला मोदी यांच्याशी सहवास लाभला. तसेच भडगांव पाचोरा मतदार संघात विकासाला न्याय देण्याचे काम आप्पानी केले आहे आणी पुढेही तोच तसाच विकास करायचा असेल तर आप्पाना निवडुन द्यावेच लागेल असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी मंचावर विविध पदाधिकारी उपस्थित होते. भुरा आप्पा, अनिल महाजन,विविध पदाधिकारी यांनी जाहीर सभेस संबोधीत केले. किशोर आप्पा यांनी आपल्या मनोगत मध्ये विकास मुद्यावर हात घातला व म्हणाले काही नामर्द येथे येऊन आपली दिशा बदलण्याचे काम करत आहेत. अफाट जनसमुदाय बघुन आप्पाचे मन गहीवरून आले असेच प्रेम असू द्या भडगांव पेठ चा रोड येणार्या एका वर्षात नाही झाला तर नगरपालीकेच्या वेळी मत मागायला येणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. यानंतर नितीन बानगुडे पाटील यांने राष्ट्रवादी काॅग्रेंसचा समाचार घेतला पंधरा वर्ष यांचे सरकार असतांना त्यांना विकासाचे शहाणपण सुचले नाही. 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा केला नसता तर महाराष्ट्रातील एक एक कानाकोपरा ओलीताखाली गेला असता. सर्व खिचड्या यांनी करून ठेवल्या हे घड्याळ दहा वर थांबले आहे तेथेच थांबू द्या, असे ते म्हणाले.. आपल्या जोरदार शैलित त्यांनी विविध उदाहरणे दिली. सर्वात जास्त निधी विकासासाठी आणणार एकमेव आमदार किशोर आप्पा आहेत. जास्त पैसा झाला की काही लोक मला आमदार झाल्यासारख वाटत. असे त्यांना वाटते येणाऱ्या 21 तारखेला विकासासाठी, भगव्यासाठी, महाराष्ट्रासाठी तुमच्या आमच्यासाठी आप्पानाच निवडुन देण्याचे आवाहन नितीन बानगुडे यांने केले. या सभेचे आभार प्रदर्शन जे.के.पाटील यांनी केले. यावेळी अफाट जनसमुदाय उपस्थित होता. या जाहीर सभेत डाॅ. संजिव पाटील, अमोल नाना पाटील, डाॅ.विशाल पाटील, डाॅ.प्रमोद पाटील, मनोहर चौधरी,गणेश आण्णा परदेशी,भुरा आप्पा, सोमनाथ पाटील,विकास तात्या, दिपक राजपुत, राजेंद्र जिभाऊ,ईम्रान अली सैय्यद, सुनिल पाटील (संपर्क प्रमुख), विनोद पाटील, भाऊसाहेब भोसले, नानासो प्रताप हरी रावजी पाटील, संतोष पाटील,जग्गु भोई, रावसाहेब पाटील, युवराज आबा,विनोद पाटील, डाॅ.नाजिम मिर्झा, अतुल पाटील,बापु चिंधा, प्रदिप महाजन,अनिल महाजन,बंटी सोनार, लखिचंद पाटील, आदि पदाधिकारी शिवसैनिक व भडगांव शहर व वलवाडी, जुवार्डी, बोदर्डे, निंभोरा, कोठली, आलेले सर्व शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते जाहीर सभेचे जे.के.पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भडगावात राष्ट्रवादी महिला आघाडी तर्फे प्रचाराचा झंझावात

Next Post

पाचोरा-भडगाव मधून आ.किशोरआप्पा पाटीलच बाजी मारणार-मतदारांकडून जोरदार प्रतिसाद

Next Post

पाचोरा-भडगाव मधून आ.किशोरआप्पा पाटीलच बाजी मारणार-मतदारांकडून जोरदार प्रतिसाद

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo