<
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध राहील.
जळगाव – (प्रतिनिधी ) – भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आर. पी. आय, (A) रासप, शिवसंग्राम, रयत क्रांती, महायुतीचे उमेदवार आ. सुरेश भोळे (राजूमामा) यांना राजपुत्र एकलव्य सेनेच्या वतीने हटकर समाज कार्यालय, जळगाव येथे दिनांक १४ ऑक्टोंबर सोमवार रोजी सकाळी ११ वाजता भव्य एकता मेळावा संपन्न झाला. मेळाव्यात महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजसाहेब साळवी, महाराष्ट्र महिला अध्यक्ष सुमनताई साळवी व महिला जळगाव जिल्हा अध्यक्ष गायत्रीताई सोनवणे हे उपस्थित होते. मेळाव्यात सर्व समाजाच्या वतीने जळगाव शहराचे महायुतीचे उमेदवार यांना जाहीर पाठींबा देण्यात आला. व आदिवासी भिल्ल समाजाला शहरात हक्काची स्मशानभूमी व पंतप्रधान घरकुल आवास योजनेअंतर्गत सर्व समाज बांधवाना घरकुल मिळावे आणि मुलांच्या शिक्षणासाठी विविध दाखले मिळवण्यासाठी सहकार्य मिळावे असे निवेदन देण्यात आले.या प्रसंगी जमील शेख, सचिन परदेशी, बाळकृष्ण सूर्यवंशी, अॅड. मीर नाझीम अली, बोरसे दादा, मचाले दादा यासह असंख्य समाजबांधव हे उपस्थित होते.