<
राष्ट्रवादीचे भडगांव तालुका कार्यध्यक्ष हर्षल पाटील आपल्या मनोगताच्या अनोखी शैलित मतदारांची मने जिकंली
भडगांव(प्रमोद सोनवणे)- आज राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, पी आर पी (कवाडे गट) व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार मा.दिलीप भाऊ वाघ यांच्या प्रचारार्थ भडगाव शहरातील यशवंत नगर भागात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.सभेचे अध्यक्ष जेष्ठ नेते मा.सुभाष आप्पा बोरसे तर प्रमुख वक्ते अल्पसंख्याक सेलचे पाचोरा शहराध्यक्ष मा. जहर भाई खान, तालुका कार्याध्यक्ष मा. हर्षल पाटील होते. वक्त्यांनी आपल्या मनोगतातून युती शासनाच्या फसव्या योजना, संपुर्ण सरसकट कर्जमाफी दिली नाही,वाढती बेरोजगारी, आर्थिक मंदी याचा व तसेच मतदारसंघाचे विद्यमान आमदारांनी तालुक्यात रस्त्यांची कामे केली, नसून फक्त स्वतःचा विकास केला व त्यांच्या खोट्या विकासकामांचा भांडाफोड केला. त्याच प्रमाणे आपले आघाडी शासन आल्यास संपूर्ण कर्जमाफी व बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल अशी ग्वाही देत मा.दिलीप भाऊंना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले, आपल्या मनोगनात राष्ट्रवादीचे भडगाव तालुका कार्याध्यक्ष मा. हर्षल दादा म्हणाले युवकांना रोजगार नाही, युवक वर्ग रोजगार नसल्यामूळे भरकटत आहे, जाती पातीचे राजकारण होत आहे. ह्या सरकारच्या आठमुठी धोरणा मध्ये मतदाराचे जगणे असह्य झाले आहे. दिवस भर राबणार्या माझ्या कष्टकरी शेतकरी शेतमजुर व हातमजुरी करणार्या मतदार बन्धुंचे, प्रचार करतांना पाठीवर हात ठेवता आणि पाठींबा राष्ट्रवादीला देत तोच आमच्या साठी मोठा आधार आहे, जनतेच्या प्रेमाच्या शिदोरीवर विजयाची शाश्वती आम्हाला आहे, सभेला सर्व समुदायाचे लोक व सर्व सामान्यांचा आतला आवाज परिवर्तना साठी न्याय देणारा आहे, भडगाव पाचोरा मतदार संघातील गावानां विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी जनसेवेचा वारसा लाभलेल्या राष्ट्रवादीला मतदार संघात विकासाच्या ध्यास घेतला असुन असा प्रत्यय राष्ट्रवादी चे भडगांव कार्यध्यक्ष हर्षल दादा पाटील यांनी सभेच्या वेळी आपले मनोगत व्यक्त केले, सभेस शहराध्यक्ष मा.शामदादा भोसले, नगर सेविका मा.योजनाताई पाटील, नगरसेवक भिकनूर पठाण, इसाक मलिक, डी डी पाटील सर, व्ही एस पाटील, बी वाय पाटील, अरुण मामा पवार, डॉ जे डी शेख, निमंन शेख, शक्ती भाऊ सोनवणे, शिवदास पाटील, गणेश पाटील, मुख्तार मिस्त्री, भगवानदादा पाटील, अनुप बोरसे, शशिभाऊ चंदिले, अतुल देसले, कुणाल पाटील, अनिल टेकडे, योगेश महाजन, विवेक पवार, मोहसीन भाई, संदीप मनोरे, आकाश कंखरे, रवींद्र पाटील, सागर पाटील, ज्ञानेश्वर पाटील, हेमंत पाटील, दस्तगिर भाई, राजुभाऊ पाटील, संजय पाटील,वीरेंद्र पाटील, विशाल पाटील, चेतन पाटील तसेच समस्थ पदाधिकारी, महिला व कार्यकर्ते असंख्य संख्येने उपस्थित होते.