<
जळगाव(प्रतिनिधी)- येथील केसीई सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात प्राचार्य डाॅ. अशोक राणे यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांग जागृतता कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून छात्रअध्यापक तथा राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे तालुका प्रसिद्धी प्रमुख असलम मन्यार यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की दिव्यांगांची जागृतता होणे काळाची गरज आहे. तसेच दिव्यांगांची समस्या सोडवणे गरजेचे आहे. दिव्यांगांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा, ग्राम निधीचा लाभ मिळावा तसेच दिव्यांगांची होणारी हेळसांड थांबवावी. दिव्यांगांना शासकीय योजनेचा लाभ मिळावा यासाठी जनजागृती होणे खूप गरजेचे आहे. यावेळी मन्यार यांनी आत्मविश्वासाने अपयशाला न डगमगता सामोरे जाण्याचा सल्लाही दिला.तसेच जितेंद्र गायकवाड यांनी दिव्यांगां विषयी विचार विषद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डाॅ.कुंदा बाविस्कर यांनी तर आभार ऐशना जैन यांनी मानले. यावेळी प्रा.डाॅ. शैलजा भंगाळे, प्रा. डाॅ. कुंदा बाविस्कर, प्रा. डाॅ. वंदना चौधरी, प्रा. डाॅ . रंजना सोनवणे, प्रा. डाॅ सुनीता नेमाडे, प्रा. डाॅ. स्वाती चव्हाण, प्रा. डाॅ. जयश्री पाटील, प्रा. रामलाल शिंगाणे, प्रा. केतन चौधरी, संजय जुमनाके आदींसह प्रथम वर्ष बीएड तसेच द्वितीय वर्ष बीएडचे छात्रअध्यापक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीते साठी छात्र अध्यापकांनी परिश्रम घेतले.