<
तालुक्यात फिरून केले मतदान करण्यासाठी प्रबोधन
एरंडोल(प्रतिनीधी)- जिल्ह्यातील वाडी वस्ती दुर्गम भागात जाऊन सर्व मतदारसंघांमध्ये शिक्षक व सामाजिक बांधिलकीच्या नात्याने जाऊन सर्व घटकांमध्ये मतदान जनजागृती विषयी प्रबोधन करण्याचे काम जळगाव जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक तथा सर्व शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक किशोर पाटील कुंझरकर यांनी उभारले असून मुळातच सुरुवातीपासून लोकप्रबोधनाची आवड असणाऱ्या या कृतिशील शिक्षकांने सर्वांनी मतदानासाठी पुढे येऊन शंभर टक्के मतदान करावे मतदान हा खऱ्या अर्थाने लोकशाहीचा आधार आहे म्हणून सर्व नागरिकांनीपुढे येऊन १००%मतदान करावे यासाठी मागील महिनाभरात ठिकाणी जाऊन संध्याकाळी प्रबोधनाची मोहीम हाती घेतली. सदरील लक्षवेधी उपक्रमाचे जळगाव जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, शिक्षणाधिकारी डॉ. डी.एम देवांग, विश्वास पाटील प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार अर्चना खेतमाळीस आदींसह सर्व स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी तसेच पत्रकार बांधवांनी अभिनंदन केले आहे. मतदान करणे साठी सर्वांना मदत करणे ही सामाजिक बांधिलकी असून देशभरातील सर्व क्षेत्रातील सर्व जण यासाठी पुढाकार घेत असून शंभर टक्के मतदान होण्याच्या संदर्भात निवडणूक आयोगा सोबतच प्रशासन सर्वांना आवाहन करत असून एक जबाबदार व चांगलानागरिक म्हणून सर्वांनी या आवाहनाला प्रतिसाद देऊन शंभर टक्के मतदान यशस्वी करणे शंभर टक्के मतदान घडवून आणणे काळाची गरज आहे यासाठी ची लोक चळवळ आता लोकांनी हाती घेणे गरजेचे आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य शासन शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक कथा राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांनी आपल्या प्रबोधन मोहिमेच्या समारोपप्रसंगी दिनांक १९रोजी शनिवारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिल्ल वस्ती गालापुर तालुका एरंडोल जिल्हा जळगाव या ठिकाणी आयोजित मतदार जनजागृती रॅली व प्रबोधन मेळाव्याप्रसंगी केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश भील, सुभाष भील, सखाराम सोनवणे, सुनील भिल, राकेश माळी, सीमाताई सोनवणे, रेखाबाई भिल, तेजाबाई भिल, अक्काबाई भील, कालू गायकवाड, आदींची उपस्थिती होती.