<
पाचोरा-(प्रमोद सोनवणे) -येथील विधानसभेच्या निवडणुकीत काही उमेदवार नैतिकचा टेंभा मिरवत महायुतीचे उमदेवार किशोर आप्पा पाटील यांना उपदेशाचे डोस पाजीत आहेत. आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या स्वछ आणि पारदर्शक कारभाराचा अनुभव पाचोरा मतदार संघातील जनतेने गेल्या २० वर्षात अनुभवले आहे. त्यांचे जनमानसातील स्थान आजही आभादीत असल्यामुळे त्यांना या निवडणुकीत जनतेतून भक्कमपणे पाठींबा मिळत आहे. परंतु काही उपटसूंभ उमेदवार त्यांच्या या लोकप्रियतेवर ईर्षा करीत असून, पराभूत मानसिकतेतून त्यांच्या विरॊधात वेगवेगळी पत्रके काढून जनतेत गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु जनता आता दूधखुळी राहिली नसून आरोप कारण्यांचा पूर्व इतिहास त्यांना माहित असल्याने जनता ह्या खोट्या अफवांना कधीच बळी पडणार नाही. आजपर्यंत अनेक निडणुकीत पाचोरा तालुका व शहरातील जनतेने यांना वेळोवेळी त्यांची जागा दाखविली आहे. पाचोरा शहरातील न.पा.च्या माध्यमातून होत असलेली प्रचंड विकास कामे भुयारी गटारीचे काम सुरु असल्याने काही ठिकाणी पडलेल्या खड्यांच्या बाबतीत हे दळभद्री विरोधक या निडणुकीत (इशू) मुद्दा बनवत आहे. परंतु पाचोरा शहरातील जनता सुद्न्य आहे. त्या असल्या फालतू मुद्द्यांना कधीही महत्व देणार नाही. याचा आम्हाला विश्वास आहे. ज्यांनी गिरणा, हिवरा या नद्यांमध्ये मोठं मोठे खड्डे पाडून या नद्यांचे वस्त्रहरण केले तेच आज नैतिकतेचा आव आणत आहेत. आज पर्यंत पाचोरा शहरातील जनतेने किशोर आप्पा पाटील यांच्या विकसित नेतृत्वावर पूर्णपणे विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे जनता महायुतीच्या बाजूनेच आपला कौल देणार आहे. भयभीत झालेल्या विरोधकांनी आपली पार्श्वभुमी तपासून घ्यावी. असे देखील लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय गोहिल यांनी सांगितले.